सारसबाग परिसरात पादचारी तरुणीची मोबाईल संच हिसकावणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले.यमनाप्पा भीमराव लिंगाप्पा नडगिरी (वय २२, रा. तुपे वस्ती, ऊरळी कांचन, सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि तिची मैत्रीण सारसबाग परिसरातील महालक्ष्मी मंदिरासमोरुन जात होती.

हेही वाचा >>> पुणे : फाटकात अडकलेल्या श्वानाची अग्निशमन दलाकडून सुटका

त्या वेळी आरोपी नडगिरीने तरुणीच्या हातातील मोबाईल संच हिसकावला. तरुणीने आरडाओरडा केला. पसार झालेल्या नडगिरीला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.