पुणे : महापालिकेत राज्य सरकारकडून गेल्या आठवड्यात तीन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेत उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत काही बदल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे.
नवीन फेरबदलांमध्ये मिळकतकर विभागाची जबाबदारी नव्याने महापालिकेत आलेल्या रवी पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मध्यवर्ती भांडार विभागाचा कारभार आशा राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आलेल्या अधिकाऱ्यांना चांगल्या खात्यांची जबाबदारी तर महापालिकेच्या सेवेत असलेल्या उपायुक्तांकडे दुय्यम खात्यांची जबाबदारी देत आयुक्तांनी अन्याय केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
महापालिकेच्या सेवेत तीन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे. यामध्ये तुषार बाबर, आशा राऊत आणि संतोष टेंगले यांचा समावेश आहे. यापैकी राऊत आणि बाबर यांना महापालिका आयुक्त राम यांनी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेतले आहे. उपायुक्त पदावरून सहायक आयुक्तपदी नियुक्ती केलेल्या प्रसाद काटकर यांच्या बदलीला मॅटने स्थगिती दिल्याने त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीवर आलेल्या टेंगले यांना अद्याप महापालिकेत रुजू करून घेण्यात आलेले नाही.
महापालिकेच्या सेवेतील उपायुक्तांसह राज्य सरकारच्या सेवेतून काही उपायुक्त महापालिकेत आल्याने आयुक्त राम यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांवर दिलेल्या जबाबदारीत बदल केले आहेत. रविंद माळी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच हे आदेश काढले आहेत.
निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे महापालिका आयुक्तांचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. यापूर्वी मिळकतकर विभागाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या सेवेतील अधिकारी अविनाश सपकाळ यांच्याकडे मोटार वाहन विभाग तसेच पर्यावरण विभाग देण्यात आला आहे.
महापालिका विभागप्रमुखांच्या जबाबदारीत झाले हे फेरबदल ..
१) संदीप कदम (घनकचरा व्यवस्थापन विभाग)
२) अविनाश सकपाळ (मोटार वाहन विभाग तसेच पर्यावरण विभाग)
३) आशा राऊत (मध्यवर्ती भांडार विभाग तसेच सुरक्षा विभाग सनियंत्रण)
४) निखील मोरे (भूसंपादन व व्यवस्थापन विभाग तसेच परिमंडळ क्र. ५)
५) संतोष वारुळे (परिमंडळ क्र. २ विभाग तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग)
६) प्रशांत ठोंबरे (मालमत्ता व व्यवस्थापन विभाग तसेच दक्षता विभाग)
७) सोमनाथ बनकर (अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग)
८) अरविंद माळी (परिमंडळ क्र. ४ विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग)
९) राहुल जगताप (ई-प्रशासक (प्रभारी पदभार) तसेच माहिती तंत्रज्ञान विभाग)
१०) माधव जगताप (आकाशचिन्ह व परवाना विभाग तसेच अग्निशमन विभाग)
११) तुषार बाबर (माहिती व जनसंपर्क विभाग, सोशल मीडिया कक्ष तसेच मंडई विभाग)
१२) विजयकुमार थोरात (सामान्य प्रशासन विभाग, तांत्रिक विभाग तसेच बीओटी सेल)
१३) संदीप खलाटे (झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन तसेच पुणे मनपा चाळ विभाग वसाहती)
१४) विजय लांडगे (स्थानिक संस्था कर विभाग, जनगणना विभाग तसेच जनरल रेकॉर्ड विभाग)
१५) प्रसाद काटकर (निवडणूक विभाग, तसेच महापालिका आयुक्त यांचे विशेष कार्यकारी अधिकारी)
१६) किशोरी शिंदे (उपायुक्त प्रशासन अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय तसेच उपायुक्त विशेष विभाग)
१७) वसुंधरा बारवे (प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग संनियंत्रण तसेच प्रशिक्षण प्रबोधिनी)
१८) जयंत भोसेकर (समाज कल्याण विभाग, समाज विकास विभाग, मागासवर्ग विभाग तसेच दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी)
१९) रवि पवार (कर आकारणी व कर संकलन विभाग, महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज तसेच क्रीडा विभाग)
२०) रमेश शेलार (मुख्य सुरक्षा अधिकारी-सहाय्यक अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग प्रमुख तसेच उपायुक्त यांच्या अधिनिस्त कामकाज)
