लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: ससून रुग्णालयाच्या आवारात नेत्रतपासणीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी १५ हजारांची रोकड, सोन्याची अंगठी असा ऐवज लुटून नेला.

याबाबत अर्जुन जोगदंड (वय ७५, रा. बनसारोळा, बीड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोगदंड ससून रुग्णालयात नेत्रतपासणीसाठी आले होते. त्या वेळी एका चोरट्याने त्यांना अडवले आणि पोलीस असल्याची बतावणी केली. जोगदंड यांना धमकावून त्यांची झडती घेतली. चोरट्याने त्यांच्या खिशातील १५ हजारांची रोकड, तसेच सोन्याची अंगठी काढून घेतली. चोरटा पसार झाला. घाबरलेल्या जोगदंड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.