पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ थांबलेल्या बसवर भरधाव मोटार आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. अपघातात मोटारीतील पाच युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बसचालकाला ताब्यात घेण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव समजू शकले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोहम आलिश खळे (वय १९, रा. कॅफेल वर्ल्ड, डीपी रस्ता, ओैंध), आयुष अंबिदास काटे (वय २०, रा. सिद्धी टाॅवर, दापोडी), मकरंद उर्फ अथर्व हंबीरराव जेडगे (वय १९, मूळ रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. पिंपळे गुरव), प्रतीक दीपक बंडगर (वय १९, रा. गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव), हर्ष नितीन वरे (वय १९, रा. पिंपळे गुरव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस शिपाई दत्तात्रय राख यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बसचालक चंद्रशेखर बाबासाहेब सुरवसे (वय ४३, सध्या रा. दैवत बिल्डिंग, नऱ्हे, मूळ रा आंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सोहम, आयुष, अथर्व, प्रतीक, हर्ष हे मित्राच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री सिंहगड रस्ता परिसरात मोटारीतून आले होते. पार्टी करुन सर्व शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास मोटारीतून भरधाव वेगाने निघाले होते. वडगाव पुलाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी बसवर मोटार आदळली. धडक एवढी जोरात होती की. मोटारीचा पुढील भागाचा चुराडा झाला. अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारीतील पाच जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस, तसेच परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमींना मोटारीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव समजले नाही. त्याच्याबरोबर असलेले मित्र गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव समजू शकले नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two youths die after motorbike hits bus on pune mumbai bangalore bypass road pune print news rbk 25 zws