आर्थिक फसवणुकीचे माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. ज्या सात ते आठ मुलांची नावे घेतली, त्यांना मी ओळखत नाही.  भारतीय जनता पक्षाकडून केवळ नीच राजकारण सुरू आहे, असे सांगत युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले.

हेही वाचा- पुणे: शासकीय वाहनांकडूनच वाहतुकीचे नियम धाब्यावर; ८५ पैकी ८० वाहने विना’पीयूसी’

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी शुक्रवारी विधानसभेत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप सरदेसाई यांच्याशी संबंधित संस्थेवर केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चौकशीचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सरदेसाई बोलत होते. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा- पुणे: नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागातील वाहतुकीत बदल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात होणार भाविकांची गर्दी

सरदेसाई म्हणाले, की हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड संस्थेचा मी २०२१मधे अध्यक्ष झालो. त्यानंतरच्या काळात आम्ही नागपूरमध्ये एकच कार्यक्रम घेतला. त्यात आर्थिक गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. यात नोकरी किंवा तत्सम कशाचाही संबंध येत नाही. मदत आणि पुनर्वसनासाठी प्रशिक्षण देणारी स्वयंसेवी संस्था आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीचा संबंधच येत नाही. आम्ही सहा मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासहिक बाहेर काढले. मात्र त्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. माझी चौकशी करायची असल्यास करावी, पण आरोपांचे पुरावे द्यावे. केवळ बदनामी करण्याचे प्रकार भाजपकडून सुरू आहेत.