टिळक परिवारातील सदस्याला उमेदवारी द्या,अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेते मंडळी मांडत आहे. ही निवडणूक जनतेवर लादली जाऊ नये ही आमची सुरुवातीपासून आहे. तुम्ही म्हणता ना, टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी द्या.तर आम्ही टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यास तयार आहोत, तर तुम्ही अर्ज मागे घेणार का आणि ही निवडणुक बिनविरोध करणार का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित करीत जर तस झाल्यास रासने उद्या उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.टिळक कुटुंबीय आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बंद दारा आड वीस मिनिट चर्चा झाली.
हेही वाचा- टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर; देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टाई यशस्वी
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज भाजपकडून हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही संधी न दिल्याने शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली होती.तर आज हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना शैलेश टिळक सहभागी झाले नाही.त्यामुळे शैलेश टिळक हे अद्याप ही भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडी दरम्यान आज दुपारी हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
त्याच दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेऊन तब्बल वीस मिनिट बंद दारा आड चर्चा केली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की,कुणाल टिळक यांच्यावर जी 20 ची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यावेळी त्याच्या सोबत 2 तारखेला मुंबईत झालेल्या चर्चे नुसार आज पुण्यात आलो आहे.तसेच टिळक कुटुंब कधीच नाराज असू शकत नाही.या कुटुंबाने पक्षासाठी संपूर्ण आयुष्य दिल आहे.काही तरी गल्लत केली जात असल्याच त्यांनी सांगितले.
हेही वाचा- हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार, शैलेश टिळक यांची घेतली भेट
तसेच ते पुढे म्हणाले की,मी चार वेळा आमदार आणि मंत्री राहिलो होतो.माझी उमेदवारी गेल्याने त्यावेळी मला देखील काही शल्य वाटलं होतं.त्याच दरम्यान पक्षाने विविध जबाबदारी देत आज राज्याचा प्रदेशाध्यक्ष आहे.पण आज एक सांगतो की,भाजपमध्ये कधी ही जाणीवपूर्वक डावलले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.