विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भवानी पेठेतील कासेवाडी, तसेच लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक परिसरात दोन जणांवर वार करण्यात आले.

हेही वाचा >>> पेट्रोप पंपावरील रोकड लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड, चोरट्यांकडून पाच कोयते जप्त

कुणाल परमेश्वर बनसोडे (वय २३, रा. चंदन हॉस्पिटलसमोर, डायस प्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. स्वप्नील मंगेश मोरे (वय २३, रा. चंदन हाॅस्पिटलसमोर, डायस प्लाॅट, गुलटेकडी) याने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल आणि स्वप्नील टिळक रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत नृत्य करत होते. त्यावेळी गर्दीत धक्का लागल्याने एका अनोळखी तरुणाबरोबर मोरे आणि बनसोडेचा वाद झाला. त्यानंतर बनसोडेला आरोपीने गर्दीतून बाहेर ओढले. त्याला शिवीगाळ केली. बनसोडेचा मित्र मोरेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अनोळखी तरुणाने बनसोडेच्या पोटावर चाकूने वार केले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण

भवानी पेठेतील कासेवाडी भागात मिरवणुकीत किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. निखिल अविनाश चौधरी (वय २५, रा. भगवा चौक, कासेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जईद तांबोळी, बिलाल खान, लतीफ शेख, चुव्वा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. निखिल कासेवाडीतील राजीव गांधी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत नाचत होता. त्यावेळी झालेल्या वादातून निखिल याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. पोलीस निरीक्षक विटे तपास करत आहेत. स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डाेक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आला. मनोज नाथ मिझार (वय २३, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मोहन भगत सोनार आणि राकेश भगत सोनार (दोघे रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मिझारने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिझार लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील चौकात पृथ्वी मंडळाच्या मिरवणुकीत नाचत होत्या. त्यावेळी किरकोळ वादातून मिझारला शिवीगाळ करुन सोनार यींनी मारहाण केली. मिझारच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.