5G service to be launched by Prime Minister Narendra Modi Mumbai Bengaluru to get first priority | Loksatta

5G Launch In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लाँच होणार 5G सेवा; ‘या’ १३ शहरांना पहिला मान

5G Launch By PM Narendra Modi: 5G सेवा परवडणारी असेल केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

5G Launch In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लाँच होणार 5G सेवा; ‘या’ १३ शहरांना पहिला मान
जाणून घ्या Vi 5G लाँचची तारीख, किंमत, स्पीड आणि इतर तपशील(photo: financial express)

5G Launch In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात 5G सेवांचे उदघाटन करतील अशी माहिती आज राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्वीट करून दिली आहे. भारताच्या डिजिटल मिशनला नवीन उंचीवर नेत आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शन इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधान, नरेंद्र मोदी 5G सेवा सुरु करतील असे या ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे.

आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असणारी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हे दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले प्रदर्शन आहे. अगदी अल्प कालावधीत देशातील 5G ​​दूरसंचार सेवांच्या 80 टक्के जोडणी पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मागील आठवड्यात सांगितले होते.

नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात वैष्णव यांनी सांगितले की “5G चा प्रवास खूप बदल घेऊन येणार आहे अनेक देशांना ४० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागली. पण भारतात कमीत कमी वेळात ८० टक्के देशवासियांना 5G ची जोडणी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच ही सेवा परवडणारी आहे याची खात्री करू आणि उद्योग शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांवर लक्ष केंद्रित करू असेही वैष्णव यांनी सांगितले.

दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 5G तंत्रज्ञानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६. ४ ट्रिलियन (४५५ अब्ज डॉलरचा) फायदा होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांश वाटा हा 5G चा असेल. उत्पादन क्षेत्रात , किरकोळ (१२ टक्के) आणि कृषी (११ टक्के) यांना 5G तंत्रज्ञानाचा फायदा होईल असे अंदाज आहेत.

या १३ शहरांना प्रथम 5G वापरता येणार..

दूरसंचार विभागच्या माहितीनुसार, भारतात 5G लाँच केल्यानंतर, भारतातील १३ शहरांमध्ये उपलब्ध होईल. २०२२ मध्ये, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारखी शहरे ५जी सेवा प्राप्त करणारी पहिली शहरे असतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘हा’ आहे बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ३० दिवसांसाठी कॉलिंग आणि डेटा होतो उपलब्ध

संबंधित बातम्या

विश्लेषण: सायबर फसवणुकीतील रक्कम कशी वाचवावी? ‘गोल्डन अवर’ का महत्त्वाचा?
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही
‘APPLE’साठी हा वर्ष ठरला जबरदस्त! 2023 मध्ये लाँच करू शकते ‘ही’ भन्नाट उपकरणे, यादीवर टाका एक नजर
अनलिमिटेड कॉलिंगसह, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा; जाणून घ्या Vi च्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनची किंमत
UPI आणि नेट बँकिंगचा वापर करताय?, मग पासवर्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे- किरीट सोमय्या
करीनाच्या धाकट्या लेकाला फुटबॉलची आवड; खेळता खेळतामध्येच…
विश्लेषण : उकळणारा तप्त लाव्हारस पाहण्याचा थरार, जीव धोक्यात घालून केलं जाणारं ‘व्होल्कॅनो टुरिझम’ आहे तरी काय?
‘बेल बॉटम’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप; खुद्द अक्षय कुमारने दिलं स्पष्ट उत्तर
Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…