Premium

ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी

उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

eight year old boy injured plaster building collapsed thane
इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: वागळे इस्टेट येथील किसननगर भागात जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग डोक्यात पडल्याने आठ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

किसननगर येथे तेलंग निवास ही तीन मजली जुनी इमारत आहे. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या इमारतीच्या खालून उत्कर्ष हा जात होता. त्याचवेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाहेरील भागातील प्लास्टर त्याच्या डोक्यात पडले. यात तो जखमी झाला.

हेही वाचा… कल्याणमध्ये इमारत बांधकामासाठी परवानगी न घेता विकासकाने जुनाट झाडे तोडली, उद्यान विभागाची नोटीस

घटनेची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उत्कर्षवर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 13:49 IST
Next Story
डोंबिवलीतील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर पडलेला पैशाचा बटवा कल्याणमधील महिलेला परत