ठाणे : महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहे. तर या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी, २७ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डुंबरे बोलत होते. या स्पर्धेमध्ये अ‍ॅथलेटिक्स, फूलबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो अशा विविध १८ क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण १३ संघ सहभागी झाले असून त्यात २ हजार ३२३ पुरुष व ६०६ महिला खेळाडू असे एकूण २ हजार ९२९ खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पधेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील एमएमआरडीएच्या क्वॉटर्स येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे साखळी सामने २२ फेब्रुवारी पासुन सुरु झाले आहेत. १ मार्च, शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेचे उद्घाटन २७ फेब्रुवारीला, गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

(

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis in thane on 1 march information share by police commissioner ashutosh dumbare zws