ठाणे: महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर यांचे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. त्या ५२ वर्षाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व रीची शंभरकर, वडील भगवान गाडेकर,भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, भाऊ अभिनेता जयंत गाडेकर, बहिण डॉ. मोना असा परिवार आहे.
अर्चना शंभरकर या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांची ‘सोलमेट’ ही कादंबरी तर ‘सारीनास’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. विदर्भातील सुप्रसिद्ध कवियित्री दिवंगत विमल गाडेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या.
त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. अर्चना यांचे पार्थिव आज, दुपारी १२ वाजल्या पासून खारघर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजताच्या नंतर खारघर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.