निसर्गचित्रांचे प्रदर्शन
वीकेएण्डच्या कॅनवासमध्ये रंग भरण्यासाठी ठाण्यातील इंद्रधनु या संस्थेच्या वतीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान ठाणे कलाभवन, मुंबई-आग्रा रोडलगत, बिग बझारजवळ, कापूरबावडी जंक्शन, ठाणे (प.) येथे सुप्रसिद्ध चित्रकार हेमंत चिपळूणकर यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता विख्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. तिन्ही दिवशी सकाळी अकरा ते संध्याकाळी सात दरम्यान हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे.
वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन
नृत्यस्पर्धा
डोंबिवलीकरांना ताल धरायला लवणारी ‘नटराज-२०१५’ ही स्पर्धा शुक्रवार, ३० जानेवारी आणि १ फेब्रवारी या दोन दिवशी सायंकाळी ७ ते १० या वेळेत, प्रकाश विद्यालयासमोरील पटांगण, गोग्रासवाडी, डोंबिवली (पू.) येथे आयोजित करण्यात आली आहे. गोग्रासवाडी प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने सलग ५ व्या वर्षी ही स्पर्धा भरवण्यात येत आहे.
‘मी अश्वत्थामा- चिरंजीव’चे प्रकाशन
कल्याणच्या इतिहासाचे ‘महाप्रदर्शन’
ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कल्याण शहरामध्ये इतिहासाचे पुरावे सांगण्याऱ्या वस्तूंचे महाप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. येथील इतिहासप्रेमी, संभाजी मित्र मंडळातर्फे शनिवार ३१ जानेवारी ते सोमवार २ फेब्रुवारी दरम्यान गुरुदेव गार्डन, संभाजीनगर, रॉयल रेसिडन्सी, आधारवाडी, कल्याण (प.) येथे सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन कल्याणकरांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात शिवकालीन/पेशवेकालीन शस्त्रास्त्रे, पुरातन नाणी, गड किल्ल्यांची छायाचित्रे, शिवरायांच्या जीवनावरील काही ठळक घटनांच्या रांगोळ्या व शिवकालीन भव्य देखाव्यांचा समावेश असणार आहे. प्रदर्शनाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -९९६७९१२४४४.
हृदयनाथांकडून संगीताचे धडे
कुटुंब रंगलंय काव्यात
डोंबिवलीत गोविंद गुणस्मरण
कृतज्ञता दिन
गतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या अमेय पालक संघटनेच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता डोंबिवलीजवळच्या खोणी गावातील संस्थेच्या घरकुलामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. ख्यातकीर्त आर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. विनोद इंगळहळीकर व ख्यातकीर्त ऑकोलॉजिस्ट सर्जन डॉ. अनिल हेरूर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात वृद्धांची वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. सुहेल लंबाते यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर सेवानिवृत्त होणाऱ्या तारा शर्मा यांना या वेळी निरोप दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – सदानंद जोशी- ९३२४३६६३०१.
पाळीव प्राण्यांसाठी आरोग्य शिबीर
अनेक कुटुंबांतील लाडके सदस्य असणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठी ठाण्यातील डॉ. ओंकार पावस्कर यांनी मोफत अँटीरेबीज लस आणि तपासणी शिबीर आयोजित केले आहे. शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत दुकान क्र.८, गजानन महाराज मंदिरासमोर, राम मारुती रोड , ठाणे (प.) येथे हे शिबीर होईल. अधिक माहितीसाठी संपर्क- २५४३८०३१.
संकलन : शलाका सरफरे
‘वीकेण्ड विरंगुळा’ सदरासाठी कार्यक्रम पाठवण्यासाठीचा पत्ता : ‘लोकसत्ता’ ठाणे कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रस्ता, ठाणे (प). ई-मेल : newsthane@gmail.com