दिवा ते सीएसएमटी रेल्वे सेवा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा मिळावा यासाठी बुधवारी सकाळी दिव्यातील प्रवाशांनी हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केले. तसेच दिवा-सीएसएमटी रेल्वे सेवा सुरू झालीच पाहीजे अशी मागणी केली. त्यानंतर प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या निषेधासाठी काळ्या फिती बांधल्याचे प्रवाशांनी सांगितले. हेही वाचा >>> ठाणे : वाहतुक शाखेच्या प्रमुखपदी कोणाची वर्णी? डॉ. विनयकुमार राठोड यांच्या बदलीनंतर पोलीस दलात कुजबुज ठाणे शहरालगत असलेल्या दिव्यात परवडणारी घरे मिळत असल्याने दिव्यात घर घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिवे शहरातील लोकसंख्या देखील वाढली आहे. हजारो प्रवासी दररोज दिवा ते ठाणे, मुंबई असा रेल्वे प्रवास करत असतात. दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा रेल्वेगाड्यामध्ये शिरणे शक्य होत नाही. काही जलद रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकात थांबा आहे. परंतु येथील प्रवाशांना या गाड्यांमध्ये प्रवेश करू दिले जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे दिव्यातील प्रवाशांचे इतर प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग देखील उद्भवतात. जून महिन्यात समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. हेही वाचा >>> कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप दिवा स्थानकातून प्रवाशांनी रेल्वेगाडीत चढू नये म्हणून एका डब्याचे दार बंद करण्यात आले होते. तर, सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वे गाडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून महिलांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला होता. दिवा स्थानकातून प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने दिवा- सीएसएमटी रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. बुधवारी दिवा प्रवासी संघटनेने दिवा सीएसएमटी रेल्वेसेवा सुरू करावी तसेच कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा यासाठी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत आंदोलन केले. तसेच प्रशासनाविरोधात घोषणबाजी केली. या वेळी प्रवाशांनी काळ्या फिती बांधून प्रवास केला.