ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा रद्द करण्यात आला आहे. निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाले असून यामुळेच चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा उद्या, मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ५ वाजता संपन्न होणार होता. या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार होता. तसेच गायक अनुप जलोटा, सुरेश वाडकर, सोनू निगम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार होता. परंतु निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाले असून यामुळेच चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांचा मातीच्या ढिगावरून प्रवास; एक महिन्यापासून मातीचा ढीग रस्त्यावरच

निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाले. या पार्श्वभूमीवर प्रकाशन समारंभ घेणे सयुक्तिक ठरणार नाही. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची तशी परंपरा नाही. त्यामुळे हा प्रकाशन समारंभ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. नजिकच्या काळात निश्चितच हा प्रकाशन समारंभ आपण घेणार आहोत, असे कार्यक्रमाचे निमंत्रक, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde biography release ceremony cancelled ssb