Deputy Chief Minister Eknath Shinde’s reaction on the successful launch of CMS-3 satellite by ISRO : ठाणे : इस्रो (ISRO) म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवारी सीएमएस-३ ( CMS-3 ) या सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून देशाच्या अवकाश क्षेत्रात आणखी एक अभिमानाची भर घातली आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रो आणि भारतीय शास्त्रज्ञांबद्दल समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सीएमएस-३ या सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून देशाच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. या यशामुळे भारतीय अवकाश विज्ञानाच्या क्रांतीत आणखी एक अभिमानाचे पान जोडले गेले आहे. सीएमएस-३ हा उपग्रह भारताचा आतापर्यंतचा सर्वात जड आणि अत्याधुनिक संप्रेषण उपग्रह मानला जात आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची राष्ट्रीय प्रगती, उत्कृष्टता आणि नवोपक्रम यांच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
देशभरातून अभिनंदन
या यशाबद्दल देशभरातून इस्रो आणि भारतीय अवकाश शास्त्रज्ञांचे अभिनंदन होत असून, देशाला अभिमान वाटावा यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या इस्रो आणि भारतीय वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन, अशा प्रतिक्रिया सर्वच जण व्यक्त करत आहेत. या प्रक्षेपणामुळे भारताच्या दळणवळण आणि उपग्रह तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी मजबुती येणार असल्याचे मानले जात आहे.
नवोपक्रमाच्या दिशेने एक मोठे पाऊल
या ऐतिहासिक यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रो आणि भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. इस्रो कडून सीएमएस-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हा भारतीय अवकाश विज्ञान क्रांतीचा एक नवीन अभिमानाचा क्षण आहे. हा नवीन, सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह आपल्या राष्ट्रीय प्रगती, उत्कृष्टता आणि नवोपक्रमाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आम्हाला अभिमान वाटावा यासाठी सतत प्रयत्न केल्याबद्दल इस्रो आणि भारतीय अवकाश शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन, असे त्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
