Eknath Shinde told the reason why he select as maharashtra Chief Minister by Narendra Modi and Amit Shah | Loksatta

“…म्हणून मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली”; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

शिंदे म्हणाले, मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो. तरी ठाण्यात घरी आल्यानंतर मला शांत झोप लागते.

“…म्हणून मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली”; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण
ठाणे महापालिकेच्यावतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ

‘हा एक जोरदार, धाडसी माणूस दिसतोय, असे माझ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटले. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली’. असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा-“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत

सुरूवातीला मुख्यमंत्री कोण होईल अशी चिंता होती. परंतु मी मोदींना आणि अमित शाह यांना एक जोरदार तसेच धाडसी माणूस वाटलो त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो. तरी ठाण्यात घरी आल्यानंतर मला शांत झोप लागते. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली असून येत्या सहा महिन्यात ठाणे खड्डेमुक्त, कचरामु्क्त करणार असल्याचे आश्वासनही शिंदेंनी ठाणेकरांना दिलं आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 15:41 IST
Next Story
अश्रुधूर नळकांड्यांच्या धुरामुळे डोंबिवलीतील इंदिरानगरमध्ये घबराट; ठाकुर्लीतील रेल्वे सुरक्षा जवानांचा सराव प्रशिक्षण कार्यक्रम