Premium

डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर मित्रांचा सामुहिक लैंगिक अत्याचार

एक मेजवानी म्हणून आरोपी दिनेश, सुनील यांनी पीडितेच्या मित्राला दारू आणण्यास सांगितले.

dombivli girl rape, live in relationship rape, live in relationship girl gangraped
डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर मित्रांचा सामुहिक लैंगिक अत्याचार (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली : येथील कुंभारखाणपाडा भागात एका तरुणाबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षांच्या तरुणीवर तिच्या दोन मित्रांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केला. रविवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणातील दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीचा मित्र आणि या दोन्ही आरोपींची ओळख आहे. तरुणीच्या मित्राला दारू आणण्यास पाठवून दोन्ही आरोपींनी तरुणी घरात एकटीच आहे, ही संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात पीडित तरुणी तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहते. ती तिचे राहते सोडण्याच्या तयारीत होती. पीडित तरुणीने तिचे घरातील सामान बांधून ते परिचित असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. रविवारी संध्याकाळी सामानाची बांधबंदिस्ती आणि आता सामान कधी इतरत्र हलविणार याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा मित्र दिनेश गडारी आणि सुनील राठोड पीडित तरुणीने सामान ठेवलेल्या घरी आले. त्यावेळी पीडित तरुणीचा मित्र आणि पीडित तरुणी घरात होते.

हेही वाचा : पावसाच्या धारात घामाच्याही धारा! ऊन पावसाचा लपंडाव, गणेशभक्तांची तारांबळ

पीडित तरुणी आणि तिचा मित्र अन्य भागात स्थलांतरित होणार आहेत. एक मेजवानी म्हणून आरोपी दिनेश, सुनील यांनी पीडितेच्या मित्राला दारू आणण्यास सांगितले. तो दारू आणण्यासाठी घराबाहेर पडताच, पीडिता घरात एकटीच आहे ही संधी साधून दिनेशने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दिनेशशी प्रतिकार करुन तरुणी घराबाहेर येऊन बचावासाठी पळू लागली. सुनीलने तरुणीचा पाठलाग करुन तिला पकडले. तिला एका रिक्षेत जबरदस्तीने बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरुन विष्णुनगर पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. साहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेघा वर्मा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dombivli 19 year old girl who is in live in relationship raped by her friends css

First published on: 21-09-2023 at 17:58 IST
Next Story
गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश; घरोघरी गणेशोत्सवासाठी चांद्रयान मोहिमेची आरास