कल्याण – नववर्षाच्या आनंदात कल्याण, डोंबिवली शहरात गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेत काही वाहन चालक बेदरकारपणे दुचाकी, मोटारी चालवित होते, दुचाकीवर तीन ते चार जण बसून प्रवास करत होते. अशा एकूण ९२ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून विशेष तपासणी पथकांनी कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्याच्या नादात अनेकांकडून विशेषता तरूणांकडून सार्वजनिक रस्त्यावर अपघात, गैरकृत्य होण्याची शक्यता विचारात घेऊन कल्याण, डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यांवर पोलीस, वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री आठ ते पहाटे चार वाजपर्यंत पोलीस शहरात येणाऱ्या, बाहेर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करत आहेत.

हेही वाचा >>> मधमाशांच्या हल्ल्यामुळे येऊरच्या जंगलात अडकलेल्या १० तरुणांची सुटका; तीघे गंभीर जखमी

शहरातील प्रत्येक नागरिकाला नववर्षाचा आनंद समाधानाने, शांततेत घेता यावा. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली आहे.

पोलीस बंदोबस्त

कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात एकूण १७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दोन साहाय्यक पोलीस आयुक्त, ८३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, ५३२ हवालदार शहराच्या विविध भागात गस्तीवर नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस ठाणेनिहाय २७ गस्ती पथके, फिरती गस्ती पथके २०, प्रतिबंधक आठ, आठ छेडछाड विरोधी पथक, आठ आस्थापना तपासणी पथके, गोपनीय गस्ती पथके आठ तैनात असणार आहेत.

हेही वाचा >>> कल्याणमधील मुरबाड रस्त्यावरील प्रेम ऑटो चौकातील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

वाहतूक पोलिसांकडून दहा ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. यावेळी इतर वाहने, दुचाकी, मोटार चालकाची मद्यसेवन केल्याची चाचणी करण्यासाठी ८ ब्रेथ ॲनालायझर सज्ज ठेवण्यात आली आहेत.

नववर्षाचा आनंद प्रत्येक नागरिकाला घेता यावा. कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण, डोंबिवली शहरात पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. अतुल झेंडे उपायुक्त, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action against reckless motorists and bikers in kalyan dombivli zws