ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वाॅर्डांचे नुतनीकरणाचे काम करताना, त्याठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असला तरी, त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही. या नियोजन शुन्य कारभारामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये प्रसिद्ध होताच, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कळवा रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय असून येथे ठाणे शहर तसेच आसपासच्या शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयातील खाटा उपचारासाठी अपुऱ्या पडत असल्याने त्या वाढविण्याचा निर्णय यापुर्वी घेण्यात आला होता. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाकडून १३५ कोटींचा निधी दिला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात ६० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामात मोठा भोंगळपणा समोर आला होता.

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

रुग्णालयातील १८ वॉर्डपैकी एका वॉर्डाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याची व्यवस्था उभारायची राहून गेल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. पालिकेने नंतर त्या वॉर्डात तातडीने वाहिनी बसवली असली, तरी उर्वरित वॉर्डाची दुरुस्तीचेे काम करताना त्याठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला. परंतु त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही. या नियोजन शुन्य कारभारामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. या संदर्भात लोकसत्ता ठाणे मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कळवा रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

दुरुस्ती कामाला फटका

ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. नुतनीकरणाद्वारे रुग्णालयातील खाटांची संख्या ५०० वरून ८४० एवढी करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते सहा महिन्यांपुर्वी निविदा काढून काम सुरु केले. आरोग्य सेवा बंद ठेवून काम करणे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने वाॅर्डाच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे या कामाला फटका बसल्याचे चित्र असून यावरून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर टिका होत आहे.

कारणे दाखवा नोटीस

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वाॅर्डांचे नुतनीकरणाचे काम करताना, त्याठिकाणी प्राणवायू (ऑक्सिजन) वाहिनी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असला तरी, त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही. या नियोजन शुन्य कारभारामुळे दुरुस्तीचे काम लांबणीवर पडले असून याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राकेश बारोट आणि वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिरुद्ध माळगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.