Thane Metro Run News / ठाणे : ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मेट्रो मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी घोडबंदर मार्गावरील चार मेट्रो स्थानकांची आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए करणार तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रन करणार आहे. यात घोडबंदर रोडवरील, गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांचं समावेश आहे. असे असले तरी ही मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात केव्हा सुरू होईल याविषयी ठाणेकरांमध्ये उत्सुकता असून या विषयी आता एमएमआरडीएने माहिती दिली आहे.

मेट्रो मार्गिका ४ व ४अ (हिरवा रंग) (वडाळा- घाटकोपर-मुलुंड- कासारवडवली- गायमुख) मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी : ३५.२० कि.मी – उन्नत (मेट्रो मार्गिका- ४ ची लांबी ३२.३२ कि.मी. व मेट्रो मार्गिका- ४अ ची लांबी २.८८ कि.मी.) आहे. एकूण ३२ स्थानके आहेत. एकूण १५,४९८ कोटी (मेट्रो मार्गिका- ४ करिता ११४.५४९ कोटी व मेट्रो मार्गिका ४अ करिता ९४९ कोटी) इतका प्रकल्पाचा खर्च आहे. दैनंदिन प्रवासी संख्या १३.४३ लक्ष (वर्ष २०३१) आणि प्रतिताशी प्रतिदिशा प्रवासी संख्या (PHPDT) – ३३४१७ इतकी आहे. मोघरपाडा (४५.५ हेक्टर) येथे डेपो लाईन ४, ४अ, १० व ११ साठी एकत्रित सुविधा.या मार्गिकेवरील धावणारी ट्रेन हि ८ डब्ब्याची असणार आहे.

प्रकल्पाचे फायदे

मेट्रो मार्ग – ४ पूर्णत्वानंतर पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर व ठाणे शहर यांच्या आर्थिक तथा व्यावसायिक केंद्रांना जोडण्यास मदत करेल, ज्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल. मेट्रो मार्ग – ४ चा विस्तार दक्षिणेला मेट्रो मार्ग-११ (वडाळा- सी.एस.टी.एम.) ला असून उत्तरेचा विस्तार हा मेट्रो मार्ग – ४ अ (कासारवडवली- गायमुख) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-१० (गायमुख – शिवाजी चौक) ला मीरा गाव पर्यंत प्रस्तावित आहे. या चारही मेट्रो मार्ग पूर्णत्वानंतर भारतातील सर्वात जास्त लांबी असा अंदाजित ५८ कि.मी चा उन्नत मार्ग उपलब्ध होऊन दैनंदिन २१.६२ लक्ष प्रवाश्यांना लाभ होईल.

या मेट्रो मार्गामुळे सध्याच्या प्रवासाच्या वेळात ५०% ते ७५% बचत होईल. हा प्रकल्प उत्तरेकडील मुंबई शहरात आणि ठाणे शहरात राहणाऱ्या प्रवाशांना पर्यावरणास अनुकूल, सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणातील लोकसंख्येकरीता अत्याधुनिक मेट्रो प्रणाली उपलब्ध करुन देईल. या मेट्रो मार्गामुळे नागरिकांसाठी प्रवास व्यवस्थेत सुधारणा व अर्थिक राहणीमान उंचावणे हे फायदे अपेक्षित आहे. या उन्नत (elevated) मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होणे शक्य होईल, ज्यामुळे रोड वाहतूक सुरळीत होईल.

मेट्रो मार्ग ४ – मोघरपाडा डेपो

मेट्रो मार्ग ४, मेट्रो मार्ग ४अ, मेट्रो मार्ग ११ व मेट्रो मार्ग १० असे चारही मार्गासाठी सुसज्ज असा कार डेपो. एकूण क्षेत्र ४५.५ हेक्टर आहे.

अपेक्षित पूर्ण होण्याचा कालावधी

टप्पा-१ – (गायमुख ते कॅडबरी जंक्शन १०.५ कि.मी., एकूण १० स्थानके एप्रिल २०२६ व ०४ स्थानके डिसेंबर, २०२५. टप्पा-२ – (कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर ११ कि.मी., ११ स्थानके) एकूण २१ स्थानके ऑक्टोबर, २०२६. टप्पा-३- (गांधी नगर ते वडाळा १२ कि.मी., ११ स्थानके) एकूण ३२ स्थानके ऑक्टोबर, २०२७ ,असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.