Mumbra Thane Train Accident Thane : आठवडाभरापूर्वीच एका खाजगी कंपनीमध्ये कामाला लागली आणि हा अपघात झाला असे बोलून स्नेहा दौंडे हिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. स्नेहावर सध्या अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मला रुग्णालयात जाऊन तिची प्रकृती पाहण्याची देखील हिंमत होत नाही असेही तिच्या वडिलांनी सांगितले.
टिटवाळा शहरांमध्ये स्नेहा ही तिच्या वडिलांसोबत राहत आहे. तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सुमारे आठवड्या भरापूर्वी तिला एका कंपनीमध्ये नोकरी लागल्याने घरचे सर्व खूश होते. कसाऱ्यावरून येणाऱ्या जलद ट्रेन मधून तिने मुंबईच्या दिशेने येण्यासाठी प्रवास सुरू केला. परंतु सोमवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये ती जखमी झाली आहे अशी माहिती कुटुंबाला मिळाली. तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्नेहाच्या वडिलांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्नेहाचे वडील आणि तिची बहीण हे रुग्णालयात दाखल झाले. स्नेहाचे वडील एकटेच रुग्णालयाच्या बाहेर बसलेले होते. तर तिची बहीण तिला पाहण्यासाठी अतिदक्षता विभागात गेली होती.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

याबाबत स्नेहाच्या वडिलांना विचारले असता त्यांनी सांगितले की माझी मुलगी देखील यामध्ये जखमी आहे. वडिलांना विचारले तुम्ही तिला रुग्णालयात पाहण्यासाठी का गेला नाहीत तर त्यांच्यावर अश्रु अनावर झाले म्हणाले. मला तिच्याकडे पाहण्याची हिंमत देखील होत नाही.

काही वेळानंतर स्नेहाची बहिण बाहेर आली तिने वडिलांना धीर दिला तसेच स्नेहाचे प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर स्नेहाचे भेट तिला वडिलांना घेऊन स्नेहाला पाहण्यासाठी रुग्णालयात गेली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane pushpak express and local train accident five dead injured sneha daunde family reaction vsd