आर्टिफिअशल इंटेलिजन्स काय आहे? ते कसे काम करते हे सांगायची आता गरज नाही. जगभरात AIची चर्चा सुरू आहे आणि काही लोक आपले काम सोपे करण्यासाठी या टूल्सचा वापर करत आहे. कलाकारदेखील आता AIच्या प्रेमात पडले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण विविध प्रकारचे AIने तयार केलेले फोटो पाहिले असतील. त्यापैकी काही फोटो मिडजर्नी अॅप वापरून तयार केले होते, ज्याची कल्पनादेखील तुम्ही करू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

AI टूल्स वापरून तयार केले भन्नाट फोटो

असे कित्येक एआयनिर्मित फोटो आहेत, जे इंटरनेटवर चर्चेत आले आणि त्यांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. मध्यंतरी काही प्रसिद्ध क्रिकेट स्टार्सचे महिलेच्या रूपातील एआयने तयार केलेले फोटो चर्चेत होते. आता बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांचादेखील या यादीत समावेश झाला आहे. बॉलीवूडचे हिरो जर महिला असते तर कसे दिसले असते अशी कल्पना करून काही एआय फोटो तयार केले आहेत. हे फोटो साहिद नावाच्या कलाकाराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक फोटोला एक स्त्रीचे नावदेखील दिले आहे.

हेही वाचा – एम. एस. धोनी नव्हे Captain Dhoni Sparrow! AIच्या मदतीने आर्टिस्टने केली कमाल! व्हायरल फोटो पाहिला का?

हेही वाचा – मोनिका, जोई, चँडलर, रॉस, फिबी, रेचल….’फ्रेंडस’मधील तुमच्या लाडक्या पात्रांचे बालपणीचं गोंडस रुप पाहिलं का? पाहा व्हायरल फोटो

अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचा समावेश

या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन हे अमिता बच्चनच्या तर शाहरुख खान हा शेहजादी खानच्या स्त्री-रूपात दिसत आहेत. यामध्ये वरुण धवन, राजपाल यादव, आमिर खान, टायगर श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि शाहिद कपूरसारख्या स्टार्सचाही समावेश आहे. पण, ते सर्व महिलांच्या रूपात दिसत आहेत.

हेही वाचा – भन्नाट! दिल्ली ते मुंबई… या २० शहरांच्या मेट्रो प्रवासाची AI ने दाखवली झलक, कुठे दिसला वडापाव तर कुठे ढोकळा, पाहा फोटो!

सोशल मीडियावर व्हायरल होताहेत हे फोटो

ही पोस्ट सोशल मीडिया वापरकर्त्यांना प्रंचड आवडली असून असंख्य लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. तसेच अनेक प्रतिक्रियादेखील मिळत आहे. काही लोकांनी सलमान खानच्या स्त्री-रूपाची तुलना चित्रांगदा सिंगसह आणि वरुण धवनची सोनम बाजवासोबत केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “आश्चर्यकारक काम.” दुसर्‍या वापरकर्त्याने “लव्ह इट,” अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ai imagines how amitabh bachchan shah rukh khan salman khan would look like if they swapped genders snk