देशात लग्नाचा सीझन असो वा नसो, पण सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये वधू-वर आणि त्यांच्या लग्नातले व्हिडीओ अनेकदा चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वराच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये लग्नसमारंभात वराने केलेल्या सरप्राईज डान्समुळे वधूला आधी धक्का बसतो. मात्र नंतर तिच्या चेहऱ्यावर हसू येते. खरं तर, वधूला सरप्राईज देण्याच्या प्रक्रियेत वर इतका अतिउत्साही होतो आणि तो ज्या पद्धतीने नाचायला उठतो, ते बघून तुम्हालाही नाचावं असं वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वराचा डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच हा व्हिडीओ लोकांना आवडत देखील आहे. लग्नसमारंभातील व्हायरल होत असलेला हा व्हिडीओमध्ये वधू आणि वर एकत्र बसलेले दिसतात. पण वराने काही वेगळेच ठरवलेले असते. मात्र, या उत्साहात तो असे काही करतो की वधूला पहिल्यांदा थरकाप होतो. मात्र, नंतर तिच्या चेहऱ्यावर हसू देखील येते. हा व्हिडीओ तुम्हालाही खूप जबरदस्त वाटेल. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर अचानक उठतो आणि वधूसाठी तयार केलेला त्याचा सरप्राईज डान्स सुरू होतो.

( हे ही वाचा: मुस्लिम वृद्धाने मधुर आवाजात गायले संस्कृत श्लोक; Viral Video पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध)

वराचा सरप्राईज डान्स येथे पहा

( हे ही वाचा: माणसाचं वय सांगते’ हे अद्भुत पेंटिंग; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video एकदा पहाच)

वराचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, असा प्रस्ताव कोणाला हवा आहे. या अपलोड झालेल्या या व्हिडीओला अडीच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An act done by the groom at the wedding that shocks the relatives as well as the bride gps