भारत चंद्राच्या अशा ठिकाणी पोहोचला आहे जिथे आजपर्यंत इतर कोणताही देश पोहचलेला नाही. शिवाय चांद्रयान-३ मोहिमेचा प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील वातावरणाची माहिती देखील गोळा करत आहे. मात्र दुसरीकडे आपला शेजारी देश पाकिस्तानातील काही लोक अजून पृथ्वी गोल आहे, यावरच विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, आपण लहानपणी विज्ञानात शिकलो आहे की, आपली पृथ्वी गोल आहे आणि ती तिच्या अक्षाभोवती फिरते. पण सध्या पाकिस्तानातील एका विद्यार्थ्यांचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरणं कठीण होत आहे. शिवाय हे लोक अजून किती मागे राहिले आहेत, अशा प्रतिक्रिया व्हिडीओ पाहणारे देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाकिस्तानातील एका मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमधील विद्यार्थी म्हणतो, “पृथ्वी गोल नाही आणि ती फिरत नाही, तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो.” व्हिडिओमध्ये एक महिला पत्रकार दिसत आहे, जी मदरशातील विद्यार्थ्याला विचारते की, मदरशांमध्ये विज्ञान, गणित किंवा इंग्रजी शिकवले जाते का? यावर विद्यार्थ्याने उत्तर देतो, आता मदरशात जगभरातील ज्ञान दिले जाते जेणेकरून मुले सांसारिक बाबींमध्ये मागे राहू नयेत आणि धर्माबरोबरच इतरही विषयातही पुढे जावीत. यानंतर पत्रकार प्रश्न विचारते की, “जमीन गोल आहे की सपाट?” यावर तो विद्यार्थी उत्तर देतो, “जमीन थांबलेली आहे. आपण असे म्हणू शकत नाही की, ती गोल आहे आणि फिरते.”

हेही पाहा- “भारत चंद्रावर पोहोचला म्हणून काय झालं, आम्ही तर आधीच…” पाकिस्तानी अँकरने स्वतःच्या देशाची केली पोलखोल, VIDEO व्हायरल

पत्रकार पुढचा प्रश्न विचारते, जर जमीन सपाट असेल तर हे ऋतू कसे बदलतात. दिवस आणि रात्र कशी होते? चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कसे लागात? यावर विद्यार्थ्याने उत्तर दिले, ही जमीन स्थिर आहे आणि चंद्र तिच्याभोवती फिरतो. सूर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. जमीन हलत नाही. यामुळेच हवामान थंड आणि गरम होते. दिवस लहान देखील सूर्यामुळे होतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. शिवाय त्यावर अनेक नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “मी हा व्हिडिओ माझ्या विज्ञान शिक्षकाला पाठवला आणि तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हार्ट फेल्युअर तर झाले नसेल ना?.” दुसऱ्या एकाने लिहिलं की, यांना इंजिनिअर्सची काहीही गरज नाही, कारण चीन त्यांच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे.. तर याआधीही चांद्रयानासंदर्भात पाकिस्तानातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये टीव्ही चॅनलवरील महिला अँकर भारत चंद्रावर पोहोचला मात्र आम्ही आमच्यातील राजकारण आणि महागाईला सामोरे जाऊ शकत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 news the earth does not rotate nor is it round video of madrassa student of pakistan viral jap