Emotional video of Young girl: जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, मेहनत आणि अथक परिश्रमांशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही. अशात आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मुलगी हवं ते काम करते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगी अखंड मेहनत करताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलगी असावी तर अशी

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मुलीचं कौतुक वाटेल. या व्हिडीओत एक तरुण मुलगी खूप मेहनत करताना दिसतेय. भरउन्हात सायकल रिक्षा चालवीत ती प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम करतेय. कसलाही कमीपणा न बाळगता, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मुलीची धडपड सगळ्यांनाच दिसतेय. या मुलीची मेहनत पाहून अनेकांनी तिच्या मेहनतीची प्रशंसा केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ kumar_quotes31 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘हर लडकी अपने पापा की परी नही होती, कई बेटीयों पर जिम्मेदारीयों का बोझ होता है’ (प्रत्येक मुलगी वडिलांची परी नसते, तर काही मुलींवर जबाबदारीचं ओझंही असतं), अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “धन्य आहे आपला भारत देश, ज्या देशाला तुमच्यासारख्या मुली मिळाल्या आहेत.” दुसऱ्याने “हिला बघूनच डोळ्यात अश्रू आले”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “ती वडिलांचं ओझं हलकं करतेय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of young girl driving cycle rikshaw for family responsibility viral video on social media dvr