Freed Palestinian prisoner hugs child after 2 years in Gaza :गाझा पट्टीमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाला आता विराम लागला आहे. युद्धविरामानंतर करारानुसार १,९०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी कैद्यांना सुटका करण्यात आली आहे. या सुटकेनंतर कैद्यांना आपल्या कुटुंबीयांशी पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. सुटलेल्या कैद्यांना घेऊन बस गाझा पट्टीत पोहोचत होत्या, आणि युद्धामुळे नुकसान झालेल्या या भागात कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.आपल्या प्रियजनांना भेटताना निर्माण झालेला भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, येथे एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात एक वडील तब्बल २ वर्षांनंतर आपल्या चिमुकल्या मुलाला भेटत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
बीबीसीच्या अहवालानुसार, ही सुटका दोन वर्षांच्या युद्धाच्या समाप्तीनंतर झालेल्या युद्धबंदी कराराचा भाग होती. या करारानुसार, १,९०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्यात आले, ज्यात सुमारे १,७०० कैदी इस्रायलच्या तुरुंगात होते, जे ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासच्या हल्ल्यानंतर कैद झाले होते. करारात असे नमूद केले होते की सोमवारी सोडण्यात आलेले कोणतेही कैदी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात सहभागी नव्हते.
पाहा Viral Video
व्हिडिओमध्ये दिसते की, मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांची बस गाझामध्ये पोहोचत आहे. बसमधील कैदी खिडकीतून बाहेर डोकावत आपल्या कुटुंबीयांना शोधत आहेत. एक वडील आपल्या मुलाला पाहतो, त्याला उचलतो आणि मिठीत घेतो, त्याच्या गालावर चुंबन देतो. हा भावनिक क्षण अनेकांच्या हृदयाला स्पर्श करतो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गाझामध्ये सुटलेल्या कैद्यांच्या स्वागतासाठी नासर रुग्णालयाजवळ तात्पुरती फील्ड हॉस्पिटल उभारण्यात आली होती. वडिलांनी मुलाला मिठी मारताना निर्माण झालेला हा क्षण लोकांना भावनिक बनवतो आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात इजिप्तमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी गाझा शांतता करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर हमास गाझामध्ये बंदींना सोडण्याची अपेक्षा होती, तर इस्रायल सुमारे २,००० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल आणि गाझा प्रदेशातून पूर्व-मान्य पिवळ्या रेषेपर्यंत माघार घेईल.