Gas Cylinder Mistake:स्वयंपाकघर म्हणजे अनेक स्त्रियांचा, तसेच जेवण बनवायला आवडणाऱ्या प्रत्येकाचा जीव की प्राण. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्यांनाच शेगडी अन् गॅस सिलिंडर लागतोच. पूर्वी चुलीवर जेवण बनवलं जायचं; पण काळानुसार गोष्टी बदलत गेल्या आणि शेगडी अन् गॅस सिलिंडर प्रत्येकाच्या घरी आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता तर गॅस पाइपलाइन आल्याने अनेक ठिकाणी सिलिंडरचा वापरही बंद झाला आहे. परंतु, ज्यांच्या घरी अजूनही सिलिंडरचा वापर होतो त्यांनी आवर्जून बघावा असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका महिलेनं सिलिंडर संपला म्हणून तो उलटा केला आणि काय अनर्थ घडला ते तुम्हीच पाहा…

शेगडीवर आगीचा भडका

एका घरातील शेगडीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये गॅस स्टोव्हवर आगीचा भडका उडाल्याचं दिसतंय आणि एक माणूस या सगळ्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतोय. हा गॅस रिपेरिंग एजन्सीमधलाच माणूस आहे, ज्याला याबद्दल चांगली माहिती आहे.

व्हिडीओ शूट करताना हा माणूस महिलेशी संवाद साधताना दिसतोय. तो म्हणतो, “याच्या आत पूर्ण लिक्विड आहे. तुम्ही सिलिंडर पूर्ण उलटा केलाय आणि तरीही ही गोष्ट नाकारत आहात.” तसंच पुढे तो गॅस सिलिंडर दाखवीत म्हणतो, “बघा या सिलिंडरला रेग्युलेटरही लावलेलं नाही. तरी गॅस स्टोव्हवर आग दिसतेय.”

सोशल मीडियावर @rewant3866 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘कधीच गॅस सिलिंडर संपायच्या वेळेस त्याला उलटं करू नका. कारण- मोठा अपघात होऊ शकतो,’ अशी कॅप्शन त्याला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला ३.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे अगदी खरं आहे,. एकदा माझ्या घरीही गॅस सिलिंडर संपला होता, तेव्हा मी असाच तो उलटा केला आणि असं घडलं होतं.” तर दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “वहिनी, सिलिंडर उलटा करून पैशांची बचत करतायत.” तर एकानं “या आगीला कसं विझवायचं,” असा प्रश्न विचारला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas cylinder empty mistake gas stove catches fire shocking video viral on social media dvr