Women Cricket Viral Video : भारतीय महिला क्रिकेट संघानं रविवारी इतिहास रचत २०२५ च्या महिला वनडे विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद मिळवलं आणि भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्या विजयानंतरच्या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर आयसीसी महिला विश्वचषक ट्रॉफी घेण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या जवळ गेली, तेव्हा एक अप्रत्याशित पण हृदयस्पर्शी प्रसंग घडला. व्हायरल व्हिडिओत हरमनप्रीत ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर येते आणि अचानक भांगडा सुरू करते! तिचा हा उत्साही नाच पाहताच इतर खेळाडूंनीही स्टेजवरच उत्साहात डान्स सुरू केला. काही क्षणांनी हरमनप्रीतने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या हातून विश्वचषक ट्रॉफी स्वीकारली.
मात्र ट्रॉफी स्विकारण्यापूर्वीटच हरमनप्रीतने भारतीय परंपरेनुसार आदर व्यक्त करत जय शाह यांच्या पाया पडली. त्यावर जय शाह यांनी स्मितहास्य करत तिला थांबवले. हा क्षण इतका मनमोहक होता की तो क्षणातच व्हायरल झाला. चाहत्यांनी सोशल मीडियावर “भारतीय संस्कृती आणि नम्रतेचं सुंदर दर्शन” असे म्हणत तिच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, या स्पर्धेत बक्षीस रकमेनंही नवा इतिहास घडवला. या स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल ₹४० कोटींचं बक्षीस मिळणार आहे, तर उपविजेत्या संघाला ₹२० कोटी मिळतील. २०२२ च्या विश्वचषकाच्या तुलनेत ही रक्कम तब्बल तीनपट जास्त आहे.
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला प्रत्येकी ₹९.३ कोटी मिळतील. या वेळेस एकूण ₹११६ कोटींची बक्षीस रक्कम ठेवण्यात आली असून, पुरुष आणि महिला विश्वचषकासाठी समान प्राईज मनी देण्याचा आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यासोबतच बीसीसीआयनेही मोठी घोषणा केली आहे. भारताच्या विजयानंतर महिला संघ, सहाय्यक प्रशिक्षक आणि निवड समितीसाठी एकूण ₹५१ कोटींच्या इनामाची घोषणा करण्यात आली आहे.
भारताच्या महिला संघानं केवळ विश्वचषकच जिंकला नाही, तर संस्कार, परंपरा आणि अभिमानाचा झेंडा जगभरात फडकावला!
