Shreyas Iyer Girlfriend:  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. विश्वचषक २०२३ मधील त्याची सुरुवात जरी खराब झाली असली तरी काही सामन्यांनंतर त्याने दमदार कामगिरीला सुरुवात केली. गेल्या चार सामन्यांमध्ये श्रेयसने एकापाठोपाठ एक धडाकेबाज खेळी खेळली. या स्पर्धेत त्याच्या बॅटने ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे मैदानावरील आपल्या कामगिरीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना खुश करणारा श्रेयस अय्यर आता एका कारणामुळे चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सध्या सोशल मीडियावर श्रेयस अय्यरबरोबर एका मिस्ट्री गर्लचे अनेक खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना श्रेयस अय्यरबरोबर दिसणारी ही मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण, असा प्रश्न पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाबरोबर दिसली ही मिस्ट्री गर्ल

अय्यरबरोबर ज्या मिस्ट्री गर्लचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती अनेकदा टीम इंडियाच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसली. एका सामन्यादरम्यान ती भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका, अनुष्का शर्मा, रितिका सजदेह, प्रीती नायरन, रिवाबा यांच्याबरोबर स्टेडियमध्ये बसलेली दिसली. यावेळी ती श्रेयसला चिअर करताना देखील दिसली. त्यामुळे या मिस्ट्री गर्लचे नेमके नाव काय आहे, असा प्रश्नही अनेक चाहते विचारत आहेत.

मिस्ट्री गर्लचे नाव काय?

श्रेयस अय्यरने कधीही त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही, पण आता पहिल्यांदाच त्याचे या मिस्ट्री गर्लबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तोही आता सिंगल नसल्याचे म्हटले जात आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, श्रेयस अय्यरला डेट करत असलेल्या मिस्ट्री गर्लचे नाव त्रिशा कुलकर्णी असे आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटर्सच्या दिवाळी सेलिब्रेशन पार्टीतही श्रेयस अय्यरबरोबर त्रिशा दिसली होती. ग्रुप फोटोमध्ये ती त्याच्या अगदी बाजूला उभी होती. यासोबतच ती श्रेयस अय्यरसोबत डिनर करतानाही दिसली होती.

इन्स्टाग्रामवर असे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत, ज्यात श्रेयस अय्यर आणि त्रिशा एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचे दिसून आले आहेत. अनेक पार्टींमध्ये ते एकत्र दिसले आहेत. वर्ल्ड कपदरम्यानच हे दोघेही शार्दुल ठाकूर आणि त्याच्या पत्नीसोबत डिनर डेटवर दिसले होते. याच कारणामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. इतकंच नाही तर नेदरलँड्सविरुद्धच्या पार्टीत जिथे सर्व भारतीय क्रिकेटर्स आपापल्या पत्नींसोबत दिसले, तिथे श्रेयस अय्यर त्रिशासोबत पोहोचला होता.

कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

श्रेयस अय्यरबरोबर दिसणारी मिस्ट्री गर्ल त्रिशा कुलकर्णी लाइमलाइटपासून दूर असते. इन्स्टाग्रामवरही तिने तिचे अकाउंट प्रायव्हेट ठेवले आहे. पण श्रेयस अय्यर तिला फॉलो करतो. या व्यतिरिक्त त्याची बहीण श्रेष्ठादेखील त्रिशाला इन्स्टाग्रामवर फॉलो करते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup final india vs australia indian shreyas iyer rumored girl friend trisha kulkarni photos videos sjr