ICC World Cup 2023 Memes : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवण्यात ट्रॅव्हिस हेडची महत्त्वाची भूमिका होती आणि त्याने अंतिम सामन्यात शतक झळकवून कांगारू संघाला विजयापर्यंत नेले. नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात विकेट्स शिल्लक असताना सामना जिंकला. मात्र, सुरुवातीला चांगल्या प्रकारे खेळणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी पुढे पार ढासळत गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशा परिस्थितीत टीम इंडियाची खराब कामगिरी पाहता, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. पण, भारताच्या खराब कामगिरीमुळे अनेक भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या परिस्थितीत एक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील एक दिसत आहे. त्यात लिहिले आहे की, अरे, बंद कर तुझा टीव्ही! अशा परिस्थितीत सर्वाधिक मीम्स श्रेयस अय्यरबद्दल पाहायला मिळत आहेत. कारण- सर्वांत कमी धावा फक्त श्रेयसकडूनच पाहायला मिळाल्या आहेत.

CWC 2023 मधील टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

विश्वचषक विजेतेपद गमावल्यानंतर भारतीय चाहते सोशल मीडियावर चांगलेच नाराज दिसत आहेत. अशा स्थितीत श्रेयस अय्यरच्या फलंदाजीवरही अनेकांनी टीका केली आहे. या यादीत शुबमन गिलचाही समावेश आहे; ज्याने केवळ चार धावा केल्या.
चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावरही टीका करत मीम्स बनवून संघाच्या खराब कामगिरीची खिल्लीही उडवत आहेत.


मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world cup 2023 after india defeat in the world cup fans criticized and sharing memes sjr