Apple iPhone 16 pro Price Drop: २० ऑक्टोबर २०२५ ला येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर अनेक लोकांची स्मार्टफोन खरेदीसाठी रांग लागते. त्यात आयफोन म्हणजे तरुणाईचा आवडता ब्रँड. फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स यांसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर आयफोन १६ प्रो, लॅपटॉप, स्मार्टवॉच, टॅबलेट आणि इतर वस्तूंवर मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
आयफोन १७ सिरीज सप्टेंबरमध्ये लॉन्च झाल्यानंतरही आयफोन १६ प्रो खरेदीदारांसाठी एक लोकप्रिय पर्याय ठरतो आहे. या फोनमध्ये ६.३ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे, ज्यात प्रोमोशन तंत्रज्ञानामुळे १२०Hz रिफ्रेश रेट मिळतो. त्यामुळे स्क्रीन खूपच स्मूद चालते आणि स्पष्ट दिसते. फोनची डिझाइन टायटॅनियम फ्रेम आणि मॅट ग्लास बॅकसह बनवलेले आहे, ज्यामुळे तो सुंदर आणि मजबूत दिसतो.
ज्यांना अँड्रॉइड वापरून कंटाळा आला आहे आणि त्यांना आयफोन घ्यायचा आहे किंवा अॅपलच्या प्रोडक्ट्सचा वापर सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी हा सणाचा काळ एक चांगली संधी आहे. चला तर मग जाणून घेऊ या आयफोन १६ वर सर्वोत्तम ऑफर्स कुठे मिळतील…
आयफोन १६ प्रो ऑफर्स (iPhone 16 pro Offers)
फ्लिपकार्ट: २५६GB आयफोन १६ प्रो आता ₹१,०४,९९९ मध्ये मिळत आहे, त्याची आधीची किंमत ₹१,१९,९०० होती. फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्ड वापरकर्ते आणखी ₹४,००० वाचवू शकतात. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीनुसार एक्सचेंज ऑफर ₹६१,९०० पर्यंत मिळू शकते. म्हणजेच हा आयफोन तुम्हाला फक्त ३९,०९९ मध्ये मिळेल.
क्रोमा: २५६GB आयफोन १६ प्रो ₹१,१३,४९० मध्ये विकत आहे. ज्या खरेदीदारांना विश्वसनीय रिटेल अनुभव हवा आहे, त्यांच्यासाठी ही थोडी ऑफर आहे.
विजय सेल्स: २५६GB आयफोन १६ प्रो ₹१,१४,९०० मध्ये उपलब्ध आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डने EMI शिवाय पेमेंट केल्यास ताबडतोब ₹५,००० ची ऑफर मिळते. म्हणजेच आयफोन तुम्हाला फक्त १,०९,९०० मध्ये मिळेल.
रिलायन्स डिजिटल: २५६GB आयफोन १६ प्रोची किंमत ₹१,१९,९०० आहे.
बिगबास्केट: १२८GB आयफोन १६ प्रो ₹९९,९९० मध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे हा सर्वात बजेट-फ्रेंडली पर्याय ठरतो.
आता आयफोन १७ सिरीज उपलब्ध असतानाही, आयफोन १६ प्रो त्याच्या कार्यक्षमतेमुळे, डिस्प्ले क्वालिटीमुळे आणि प्रीमियम डिझाईनमुळे खरेदीदारांसाठी आकर्षक पर्याय आहे. सणाच्या काळातील सवलती, एक्सचेंज ऑफर आणि बँक-विशेष फायदे मिळाल्यामुळे, तंत्रज्ञान आवडणाऱ्यांसाठी हा फोन अपग्रेड करण्यासाठी उत्तम वेळ आहे.