इंस्टाग्राम, युट्यूब अन् फेसबूकवर व्हायरल होणारे रील आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाले आहेत. अनेकांना दिवसभर रिल्स पाहण्याची सवय असते तर अनेकांना दिवसाभराच्या धावपळीतून क्षणभर विसावा म्हणून रिल्स पाहण्याची सवय असते. ६० सेकंदाचे रिल्समुळे पटकन काहीतरी मनोरंजक पाहायला मिळते. रिल्स व्हिडिओ तयार करणे हे नवीन करिअर झालं आहे. ज्याच्याकडे मोबाईल कॅमेरा आहे, इंटरनेट आहे आणि व्हिडीओसाठी भन्नाट कल्पना आहे अशी कोणतीही व्यक्ती रिल्स व्हिडिओ बनवू शकते. सोशल मीडियावर रोज कित्येक रिल्स व्हिडीओ पोस्ट केले जातात पण सर्वच व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडत नाही. मोजके व्हिडिओ असे असतात ज्यात काहीतरी असं असते जे प्रेक्षकांना प्रचंड आवडतं असे रिल्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही चांगला संदेश देणारे असतात, काही खळखळून हसवणारे तर काही धक्कादायक असतात. अनेक क्रिएटर आहेत जे असे व्हिडिओ तयार करतात जे नेटकऱ्यांना पोटधरून हसण्यास भाग पाडतात. अशाच पुण्यातील क्रिएटरच्या सध्या रिल्स व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

हलके-फुलके विनोदी व्हिडिओ बनवण्यासाठी डॅनी पंडीत(dannyypandit) आणि शरण शेट्टी (@sharan_shetty_7)
हा पुण्यातील किएटर ओळखला जातो. कधी आपल्या आसापास दिसणाऱ्या लोकांची नक्कल करताना दिसतो तर कधी विविध स्वभावाचे लोकांचे अनुकरून करून नेटकऱ्यांना खळखळून हसवतो. गेल्या काही दिवसापासून त्याचे काही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे त्यापैकी एक म्हणजे रांगोळी सॉन्ग व्हिडिओ.

खरंतर सोशल मीडियावर दोन व्हिडिओ चर्चेत आले होते ज्यामध्ये दाक्षिणात्य महिला बँड बाजाच्या तालावर थिरकत होत्या तर एका व्हिडीओमध्ये एक सेल्समन रांगोळी काढण्याचे छाप हटके स्टाईलमध्ये विकत होता. दोन्ही व्हिडीओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. डॅनीने याच व्हिडीओमधील पात्रांची हुबेहूब नक्कल केली अन् नेटकऱ्यांना हसायला भाग पाडलं.

दाक्षिणात्य महिलांप्रमाणे डॅनी आणि शरण दोघांनी चक्क साडी नेसून, केसांचा विग लावून अगदी त्या महिलांप्रमाणेच डान्स केला तर दुसऱ्या व्हिडीओतील डॅनीने सेल्समन काकांची हुबेहूब नक्कल करत व्हिडिओ पोस्ट केला. दोन्ही व्हिडिओ पुन्हा तयार करताना त्याने आपल्या विनोदी शैलीचा तडका दिलाच जो प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या दोन व्हिडीओचे मिक्सिंग करून vj_music07ने रांगोळी सॉन्ग तयार केले जे सध्या तुफान व्हायरल होत आहे.

“झटपट पटापट….लक्ष्मी जी घर के अंदर…प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट पटापट…..झटपट पटापट….” हे गाणे ऐकताच लोकांचे पाय थिरकत आहे. व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. अनेक लोक याच रांगोळी सॉन्गवर नाचताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.