karan arjun virat babar azam look same person in their childhood pics netizens react | Loksatta

लहाणपणीचे ‘करण-अर्जुन’! विराट कोहली आणि बाबर आझमच्या सेम टू सेम दिसणाऱ्या फोटोवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

अलीकडेच, विराट कोहली आणि बाबर आझमचा बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात दोघांनी एकाच प्रकारचा चेक्सचा शर्ट घातलेला आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे.

लहाणपणीचे ‘करण-अर्जुन’! विराट कोहली आणि बाबर आझमच्या सेम टू सेम दिसणाऱ्या फोटोवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
photo(social media)

Virat Kohli- Babar Azam: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम हे सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. क्रिकेटविश्वात दोघांमध्ये अनेकदा तुलना केली जाते. कोहली आणि बाबर या दोन्ही फलंदाजांना एकमेकांबद्दल अपार प्रेम आणि आदर आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. अलीकडेच, विराट कोहली आणि बाबर आझमचा बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात दोघांनी एकाच प्रकारचा चेक्सचा शर्ट घातलेला आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.

( हे ही वाचा: OMG: डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून काढले तब्बल ६२ चमचे; असा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच घडल्याने ऑपरेशनचाही बनवला व्हिडिओ)

बाबर आझम सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. दुसरीकडे, विराट कोहली ज्याने नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपमध्ये फॉर्म मिळवला आहे.

( हे ही वाचा: नवरात्रीमध्येही दिसून आली मोदींची क्रेझ; गरब्यासाठी महिलांनी पाठीवर काढले मोदी-ट्रम्प यांचे टॅटू)

विराट कोहली आणि बाबर आझम लवकरच ऑस्ट्रेलियात भेटतील जिथे क्रिकेट कॅलेंडरमधील सर्वात मोठ्या सामन्यात भारत पाकिस्तानशी भिडणार आहे. या वेळीची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. उभय संघांमधील हा शानदार सामना २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 10:34 IST
Next Story
ग्रॅमी पुरस्कार विजेता रॅपर कुलिओचे निधन; मित्राच्या घरी घेतला अखेरचा श्वास