उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डॉक्टरांनी विजय नावाच्या ३२ वर्षीय व्यक्तीच्या पोटातून ६२ चमचे काढले आहेत. या व्यक्तीचे ऑपरेशन सुमारे २ तास चालले. डॉक्टर राकेश खुराना यांनी सांगितले की, व्यक्ती अजूनही आयसीयूमध्ये आहे. तो एक वर्षभर चमचे खात होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण

मुझफ्फरनगर पोलीस ठाण्याच्या मन्सूरपूर क्षेत्रांतर्गत बोपाडा गावात राहणाऱ्या ४० वर्षीय विजयला पोटात तीव्र वेदना होत असताना मुझफ्फरनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता ते आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी विजयच्या कुटुंबीयांना सांगितले की, त्याच्यावर तातडीने ऑपरेशन करावे लागेल. यानंतर विजयवर शस्त्रक्रिया केली असता त्याच्या पोटातून स्टीलचे चमचे बाहेर आले, ज्याचा पुढचा भाग गायब होता.

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

६३ चमचे बाहेर आल्यावर सर्वत्र चर्चा

डॉक्टरांनी विजयच्या पोटातून एकामागून एक ६३ चमचे काढले आणि ऑपरेशनचा व्हिडिओही बनवला. असा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणी इतके चमचे का खाईल? मात्र, विजयच्या कुटुंबातील कोणीतरी त्याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे सांगितले. या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवण्यात आले. तेथे विजयला चमचे खाऊ घालण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे