Viral video: पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा माणसांच्या जास्त जवळ असतो. कुत्रा माणसाप्रमाणेच मालकाला जीव लावतो त्यामुळे अनेक जणांचं कुत्र्यावर जास्त प्रेम असतं.आपल्या सभोवताली आपल्या प्राण्यांवर प्रेम करणारे आणि प्राण्यांना त्रास देणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आढळतात. काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही विनाकारण कुत्र्यांना त्रास देतात.प्राण्यांवर प्रेम करणारे फक्त आपल्या पाळीव कुत्र्यांचीच काळजी करतात, असं नाही. तर, इतर कुत्र्यांबद्दलही त्यांना तितकंच प्रेम असतं. कुठे जात असताना जर, एखादा कुत्रा अडचणीत दिसला तर असे लोक त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात.असाच एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळावर अडकलेल्या कुत्र्याला मदत केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा रेल्वे रुळांमध्ये अडकतो हे दिसत आहे. या दरम्यान, कुत्रा मदतीच्या आशेने इकडे तिकडे पाहू लागतो. दरम्यान समोरून भरधाव वेगात एक गाडी येताना दिसत आहे. दुसरीकडे, एक तरुण स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर उडी मारतो आणि कुत्र्याला पकडून प्लॅटफॉर्मवर सोडतो. यावेळी ट्रेन येत असते तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर असलेले इतर प्रवासी तरुणाा पटकन वर येण्यास मदत करतात. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, जर लोकांनी त्या कुत्र्याला वेळीच मदत केली नसती, तर त्याचा नक्कीच जीव गेला असता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आनंद शोधला की सापडतोच! दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, डोक्यावर छप्पर नाही, मात्र चिमुकल्यांचं जगणं एकदम रॉयल

एका कुत्र्याला वाचवण्यासाठी एक माणूस कसा जीव धोक्यात घालतो, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man rescues dog stuck on railway tracks video viral on social media srk