scorecardresearch

Premium

VIDEO: आनंद शोधला की सापडतोच! दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, डोक्यावर छप्पर नाही, मात्र चिमुकल्यांचं जगणं एकदम रॉयल

Viral video:दोन वेळच्या अन्नाची भ्रांत, डोक्यावर छप्पर नाही, मात्र चिमुकल्यांचं जगणं एकदम रॉयल

2 childrens video viral on social media
आनंद शोधला की सापडतोच, दोन चिमुकल्यांचा Video व्हायरल

Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवतात, काही व्हिडीओ रडतात तर काही विचार करायला भाग पाडतात. आपल्या ताटात ३ वेळेचं गरम जेवण, डोक्यावर छप्पर अन् अंगावर कपडे असूनही आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टींचं दु:ख करत बसतो. तर काहींच्या डोक्यावर छप्पर सोडा पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. मात्र या परिस्थितीतही हे लोक आनंदानं आयुष्य जगत असतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतात. अशाच दोन चिमुकल्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या चिमुकल्यांकडे बघून कळतं की, आयुष्यात काही नसतानाही कसं आनंदी राहायचं.

चिमुकल्यांच्या सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगा आणि मुलगी रस्त्याच्या कडेला उभे आहेत. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांशी ते हात मिळवत आहेत. यावेळी कुणाचा हात मिळवला यावरुन ते दोघेही खूश होत आहेत. हात मिळवण्यासाठी हे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना हात पुढे करत आहेत. यावेळी दोघांपैकी लोक कुणाचा हात हातात घेतात यावरु दोघांमध्ये पैज लागल्यासारखे ते खूश होत आहेत. आनंद शोधला की तो कशातही सापडतो याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ.

Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
balmaifal, cat, love, kittens, story, memory, kids, child, mother,
बालमैफल : मांजरीचं प्रेम..
chandrapur crime news, son killed mother, son killed mother with axe marathi news
चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
woman committed suicide with her two-month-old baby connection with Postpartum depression
‘तिनं असं का केलं…?’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पाकिस्तानच्या ९० हजार सैन्याला नमवणाऱ्या सॅम माणेकशा यांच्या तीन पाठिराख्या; जाणून घ्या कामगिरी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @Shekharcoool5 या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When life teach you to be happy in every 2 childrens video viral on social media srk

First published on: 03-12-2023 at 17:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×