Mumbai Local Fight Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. अशातच लोकलमध्ये होणारी भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत. त्यात महिला डब्यातील भांडणं काही औरच असतात.

सोशल मीडियावर अनेकदा अशा भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात या व्हिडीओमध्ये ज्यात मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात दोन माणसांमध्ये जोरदार वाद होतो आणि हा वाद मारामारीपर्यंत पोहोचतो.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका ट्रेनमध्ये दोन महिला मारामारी करताना दिसत आहेत. मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना उल्हासनगर स्टेशनजवळ घडली. एक मुलगी चौथ्या सीटवर बसली नव्हती. तिथे उपस्थित असलेले सर्व प्रवासी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण ती कोणाचेही ऐकत नव्हती आणि गोंधळ घालत होती. ती सर्वांशी उद्धटपणे बोलत होती. तिथे सीटवर बसलेल्या महिलेने तिला खूप समजवलं तरीही ती ऐकायला तयार नव्हती आणि म्हणून तिला अद्दल घडवली. महिलांनी तिला मारहाण केली नाही, पण जसा तिचा अहंकार होता त्याप्रमाणे तर तिला मारायलाच हवं होतं. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

महिलांच्या मारामारीचा हा व्हिडीओ @Zuber_Akhtar1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “जेव्हा पतीने तिला पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पत्नी संतापली आणि तिने राग त्याच्या गाडीवर काढला. तिने गाडीच्या सर्व खिडक्या तोडल्या, जी मेकॅनिकच्या दुकानात पार्क केली होती. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे घडली.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

ट्रेनमधील महिलांचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आम्ही हे जेंट्स डब्यात मिस करतो”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “जीव केवढा माज केवढा” तर एक जण कमेंट करत म्हणाला, एकटी भिडली सगळ्या बायकांना, बायका सभ्य होत्या म्हणून नाहीतर हीचं काही खरं नव्हतं” तर एकाने “हीला पुढच्या स्टेशनला उतरवायला पाहिजे होतं”, अशी कमेंट केली.