अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Metro Bridge Collapse Video: मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या तुफान पावसामुळे मागील काही दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणहून हृदयद्रावक दुर्घटनांचे फोटो व व्हिडीओ सातत्याने समोर येत आहेत. अशातच लाईटहाऊस जर्नलिझमला पूल कोसळल्याचा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये एक पूल कोसळताना दिसत आहे,

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Epstein’s Sheet ने आपल्या प्रोफाइल वर व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हायरल व्हिडिओ डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून आमचा तपास सुरू केला. यामुळे आम्हाला व्हिडिओमधील अनेक कीफ्रेम्स मिळाल्या. आम्ही प्रत्येक कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज शोध चालवला.

एका कीफ्रेमवर आम्हाला टिकटॉक व्हिडिओ लिंक मिळाली, ज्यामध्ये ‘ब्रिज कोलॅप्स बँकॉक’ असे म्हटले होते. भारतात TikTok वर बंदी असल्याने, आम्ही लिंक उघडू शकलो नाही, परंतु यावरून आम्हाला पहिला संकेत मिळाला की हा व्हिडिओ बँकॉकचा असू शकतो. त्यानंतर आम्ही कीवर्ड वापरून गूगल सर्च इंजिनवर शोध घेतला आणि आम्हाला MustShareNews या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला.

हा व्हिडिओ १२ दिवसांपूर्वी १३ जुलै २०२३ रोजी चॅनलवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखाच होता.

त्यानंतर आम्ही घटनेशी संबंधित बातम्यांचा शोध सुरू केला. आम्हाला असोसिएटेड प्रेसमध्ये प्रकाशित झालेला एक लेख सापडला.

लेखात नमूद केले आहे की, थायलंडच्या राजधानीत बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याने दोन लोक ठार झाले. बँकॉक मेट्रोपॉलिटन अॅडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात आणखी ११ जण जखमी झाले. बँकॉकचे गव्हर्नर चडचार्ट सिट्टीपन यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला.

आम्हाला याबद्दल आणखी काही बातम्या आढळल्या.

आम्हाला YouTube वर अपलोड केलेला दुसरा व्हिडिओ सापडला ज्याने अपघाताचा वेगळ्या अँगल दिसून येत होता. हा व्हिडिओ CGTN चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

निष्कर्ष: बँकॉकमधील पूल कोसळल्याचा व्हायरल व्हिडिओ भारतात मेट्रो पूल कोसळला म्हणून शेअर केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains major accident metro bridge collapsed viral video reality check confirms that video is from bangkok svs