सोशल मीडियाच्या जगात सध्या क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर यांचा बोलबाला आहे. त्यांचे मजेशीर, तर कधी प्रेरणादायी व्हिडीओ अनेकांना प्रेरित करतात. तर, पहिल्यांदाच या क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सरसाठी नॅशनल क्रिएटर्स अवार्ड्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पहिल्यावहिल्या नॅशनल क्रिएटर्स अवार्ड्स सोहळ्यात डिजिटल किएटर्सना पारितोषिके देण्यात आली आहेत. पण, या कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. त्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. पण, मी पहिल्यांदा पाहतोय की, येथे उपस्थित पुरुषही टाळ्या वाजवत आहेत. आज पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व महिलांचे मी अभिनंदन करतो. मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान आहे. मी देशातील आणि जगातील सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे.”

हेही वाचा…MahaShivratri 2024 : महाराष्ट्र्रातील ‘ही’ प्राचीन शिव मंदिरे तुम्ही पाहिली आहेत का? जाणून घ्या… 

व्हिडीओ नक्की बघा…

तसेच यादरम्यान गॅसवरील अनुदानाचा संदर्भ देत महिला दिनानिमित्त खास भेटवस्तू म्हणून गॅस सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे ; असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले. ते म्हणाले, “येत्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक होणार आहे. पण, हा कार्यक्रम त्यासाठी नाही. मी तुम्हाला खात्री देतो की, पुढच्या शिवरात्रीला असा कार्यक्रम आयोजित करेन. मला विश्वास आहे की, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त माझ्यावर मरता आणि तुम्ही माझ्यावर यासाठी मरता कारण, मी तुमच्यासाठी जगतो. जो स्वतःसाठी जगत नाही त्याच्यासाठी मरणारे खूप जण असतात. त्यामुळे तुम्ही सगळेच माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात” ; असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान ऐकताच कार्यक्रमातील उपस्थित मंडळींमध्ये हास्याची एकच लाट पसरल्याचे दिसून आले आणि सगळ्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी नारे द्यायला सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ ANI यांच्या @ANI या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi presents first national creators award at bharat mandapam but prime minister statement caught everyone attention asp