PM Modi Rally Empty Chairs Video: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा चालू आहेत. शनिवारी मोदींनी हरियाणातील अंबाला आणि सोनीपत येथे सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राम मंदिर आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय हरियाणातील आप-काँग्रेस आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. मात्र हरियाणामध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.या मूळ व्हिडीओचा संबंध पुणे, महाराष्ट्र येथे झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेशी असल्याचे न्यूजचेकरच्या तपासात दिसून आले आहे. नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया ..
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल व्हिडीओ सुमारे २७ सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये रॅलीत रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत. याशिवाय पार्श्वभूमीत पीएम मोदींचे भाषण वाजताना दिसत आहे, त्यात ते असे बोलत आहेत, “जब तक मोदी है, इंडिया आघाडी वालों की सारी साजिशें नाकाम करता रहेगा. साथियों, कांग्रेस शासन की एक और पहचान रही है. आतंकवादियों को खुली छूट. हम कैसे भूल सकते हैं वो समय जब.. ”.
तपास:
व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींच्या आवाजात ऐकू येणाऱ्या शब्दांच्या मदतीने न्यूजचेकरने गुगलवर सर्च केले. या दरम्यान, narendramodi.in या वेबसाईटवर २९ एप्रिल २०२४ रोजी पीएम मोदींनी पुणे सभेत दिलेल्या भाषणाचा संपूर्ण मजकूर आम्हाला मिळाला.
या मजकुरात व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित ऑडिओ भाग देखील समाविष्ट आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला कोंडीत पकडले होते. मोदी म्हणाले होते की, “यांनी (इंडिया आघाडीने) काय केलं. एका रात्रीत मुस्लिमांसाठी फतवा काढून त्यांना ओबीसी बनवून टाकलं. सकाळी ओबीसींसाठी असणाऱ्या २७ टक्के आरक्षणाचार सगळा फायदा त्यांनी या स्वयंघोषित ओबीसींना दिला. त्यामुळे ओबीसी गटाची कोंडी झाली. मला सांगा, हे असं देशात घडलेलं चालेल का? या इंडिया आघाडीच्या लोकांनी कान उघडून ऐकावं, मोदी अजून जिवंत आहे. लक्ष देऊन ऐका. धर्माच्या आधारे आरक्षण होऊच देणार नाही. या देशात असं घडणार नाही आणि घडवू इच्छिणाऱ्यांना या देशाच्या राजकीय पटलावरून कायमचं पुसून टाकलं जाईल. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत इंडिया आघाडीची सगळी कटकारस्थाने मी मोडून काढेन.”
मित्रांनो, काँग्रेस सरकारची आणखी एक ओळख म्हणजे त्यांनी दहशतवाद्यांना खुलेआम सूट दिली होती आपण हे कसं विसरू शकतो की काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत दर दुसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबई- पुण्याला त्यांनी हादरवून सोडलं होतं. जर्मन बेकरीसमोर काय झालं होतं?”
आम्हाला या भागाचा व्हिडीओ २९ एप्रिल २०२४ रोजी पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब अकाऊंटवरून लाइव्ह केलेल्या व्हिडीओमध्ये देखील सापडला. सुमारे ३९ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये हा भाग पाहता आणि ऐकता येतो. याशिवाय, व्हायरल क्लिपच्या भागात आम्हाला गर्दीचे दृश्य देखील पाहायला मिळाले, ज्यामध्ये लोक दूरवर बसलेले दिसत होते.
संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केल्यावर, आम्हाला २९ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्रातील कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेले ट्विट आढळले. या ट्विटमधील व्हिडीओ व्हायरल झालेल्या क्लिपसारखेच होते. पुण्यात झालेल्या पीएम मोदींच्या सभेत बहुतांश खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा रोहित पवार यांनी कॅप्शनमध्ये केला होता.
मात्र, रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये असलेल्या ऑडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाचाही समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदी असे म्हणताना दिसले की, “संत समाज सुधारक देश को दिए हैं और आज ये धरती, दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है, टेक एंटरप्रेन्योर दे रही है”.
पंतप्रधान मोदींची ही वाक्ये आम्ही शोधली तेव्हा लक्षात आले की, पुण्यातील या सभेत पंतप्रधानांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. पीएम मोदी म्हणाले होते की, “साथियों, इस धरती ने महात्मा फुले, साबित्री बाई फुले जैसे अनेक संत समाज सुधारक देश को दिए हैं. और आज ये धरती, दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है, टेक एंटरप्रेन्योर दे रही है. पुणे जितना प्राचीन है, उतना ही फ्यूचरिस्टिक है”.
व्हायरल क्लिपमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची तुलना पुण्यातील रॅलीच्या व्हिडीओशी केली असता आम्हाला अनेक साम्य आढळले, जे तुम्ही खालील चित्रातून समजू शकता.
हे ही वाचा << VIDEO: आईच्या कुशीतून बाळ बाल्कनीत पडलं; लोकांचे टोमणे अन् सोशल मीडियावर ट्रोल केल्यानं आईनं जीवन संपवलं
आम्ही पंतप्रधान मोदींच्या अंबाला आणि सोनीपतच्या सभांचे व्हिडीओही पाहिले. दरम्यान, दोन्ही रॅलींमध्ये भाषण करताना पंतप्रधान मोदींनी कोणत्याही प्रकारची पगडी घातली नाही, तर पुण्याच्या सभेत त्यांनी स्थानिक पारंपरिक पगडी घातल्याचे आम्हाला आढळले.
निष्कर्ष: आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ हरियाणाचा नसून पुण्यातील पीएम मोदींच्या रॅलीचा आहे. मात्र, व्हायरल झालेला व्हिडीओ पुण्यातील मेळाव्यादरम्यान किंवा नंतर काढण्यात आला होता हे कळू शकले नाही.
अनुवाद- अंकिता देशकर
(ही कथा मूळतः न्यूजचेकरने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)