Raksha Bandhan Viral Video: बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन तिला देतो. वर्षानुवर्षे चालत आलेला हा सण बहीण भावंडाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या वर्षी आज सोमवार, १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रक्षाबंधनाचा हा सण जवळ आला की, दरवर्षी सोशल मीडियावर भाऊ-बहिणीच्या नात्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. पण, एक व्हिडीओ असा आहे की, जो दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि नेहमीच नेटकऱ्यांच्या लक्षात राहतो. या वर्षी पुन्हा एकदा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीचा हा व्हिडीओ आहे.

हेही वाचा… Raksha Bandhan Outfit Ideas: लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनाच्या दिवशी इतरांपेक्षा सुंदर अन् हटके दिसायचंय? मग नक्कीच पाहा हे ६ ट्रेंडिंग आउटफिट्स

व्हायरल व्हिडीओ (Raksha Bandhan Viral Video)

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चिमुकली आपल्या भावाला ओवाळताना दिसतेय आणि तिची आई रक्षाबंधनासाठी एक खास गाणं म्हणताना दिसते.

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया

हे गाणं म्हणताना अचानक ती चिमुकली ओवाळायचं थांबते आणि आईला म्हणते, “तू, मला वेडी म्हणालीस”, असं म्हणताच हशा पिकणारच की… चिमुकलीचा हा विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments)

‘viralinmaharashtra’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “सो क्यूट”. तर एक जण म्हणाला, “दीदी रॉक, मम्मी शॉक” तर अनेकांनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अगदी कमी वेळातच या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज आले आहेत; तर ४,७४० लाइक्स आले आहेत.

हेही वाचा… Raksha Bandhan Mehndi Design: रक्षाबंधनासाठी ‘या’ सोप्या मेंदी डिझाइन्स ट्राय कराच! आणखी शोभून दिसेल तुमचा लूक

दरम्यान, दरवर्षी सोशल मीडियावर रक्षाबंधनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. राखी बांधताना चाललेली मजा-मस्ती, ओवाळणीसाठी होणारी मजेशीर भांडणं अनेकदा आपण या व्हिडीओंद्वारे पाहतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan viral video of little girl funny video on social media on rakhi day dvr