Shocking video of girl abusing auto driver: एका धक्कादायक घटनेत उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये रिक्षाचालकाने एका तरुणीकडून भाडे मागितल्यानंतर तिने त्याला शिवीगाळ करीत क्रूरपणे मारहाण केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ती मुलगी रिक्षाचालकाच्या कानाखाली मारत आहे, तसेच रिक्षाच्या आत आणि बाहेर ढकलून त्याला शिवीगाळीसह मारहाण करीत आहे. या वादाच्या वेळी रिक्षाचालक हात जोडून माफी मागतानादेखील दिसला.

तरुणीची दादागिरी

कटरा पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरात भरदिवसा ही घटना घडली. त्या तरुणीची हात जोडून माफी मागत चालकाने सोडण्यास सांगितले असतानाही तिने रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. ती थांबली नाही आणि त्याला मारहाण करत राहिली. तिने या संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग केले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, जो पटकन व्हायरल झाला.

हेही वाचा… “ती नजर, ती अदा…”, प्राजक्ता माळीच्या मदनमंजिरी गाण्यावर थिरकला तरुण, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत

अहवालानुसार, त्या तरुणीने रस्त्याच्या मधोमध हे सगळे केले. कारण- रिक्षाचालकाने तिच्याकडे रिक्षाप्रवासाचे भाडे मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार देत रिक्षाचालकाला जमावासमोर बेदम मारहाण केली आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केला.

पोलिसांचा प्रतिसाद आणि कारवाई

रिक्षाचालकाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कटरा पोलिस ठाण्यामध्ये संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

हेही वाचा…. याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले, “या प्रकरणात, फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे, कटरा पोलिस ठाण्यामध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास कारवाई केली जात आहे”.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सने यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एखाद्याचा खून झाला तरी पोलीस तक्रार नोंदवण्याची वाट पाहतील का?” दुसऱ्याने “जर ही महिला बरोबर असती तर तिने इतके नाटक रचले नसते आणि ती थेट पोलिस स्टेशनला गेली असती. कारण- आजकाल महिलांच्या खोट्या तक्रारीवरही पोलिस पुरुषांवर कारवाई करतात” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “काहीतरी झालं असेल, सत्य जाणून घेतल्याशिवाय आपण मुलीला चुकीचं ठरवू शकत नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of a girl abuses and assualt auto driver over fare in up mirzapur video viral on social media dvr