आजकाल प्रत्येकाच्या घरी डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन येत असतात. अगदी लहान मोठ्या गोष्टींसाठी आपण ऑनलाईन ऑर्डर्स करतो. त्या वेळेत पोहोचाव्यात यासाठी डिलिव्हरी बॉयदेखील तितकीच मेहनत घेत असतात. पण अनेकदा काही डिलिव्हरी बॉय आपली हद्दच पार करतात. सोशल मीडियावर अशा डिलिव्हरी बॉयच्या विकृत कृतींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात कधी कोणी दरवाजाबाहेरच्या चपला लंपास केल्याचं दिसून आलंय, तर कोणत्या डिलिव्हरी बॉयने अश्लील कृत्य केल्याचं समोर आलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल कोण काय करेल याचा काही नेम नाही. सध्या डिलिव्हरी बॉयचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एका डिलिव्हरी बॉयने एका बिल्डिंगमधील लिफ्टमध्ये चक्क लघवी केली आहे. नेमकं काय घडलंय, ते जाणून घेऊ या…

डिलिव्हरी बॉयचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक डिलिव्हरी बॉय पार्सल पोहोचवण्यासाठी एका बिल्डींगच्या लिफ्टमधून इच्छित स्थळी जात असतो. त्याच्याबरोबर दुसरा डिलिव्हरी बॉयदेखील असतो. दोघं गप्पा मारत मारत बिल्डिंगमधील एका मजल्यावर उतरतात आणि पार्सल दरवाजाजवळ ठेवतात. पार्सल ठेवल्यानंतर पहिला डिलिव्हरी बॉय पायानेच लिफ्ट थांबवतो आणि लिफ्टमध्ये जाताच तो पॅंटची चेन उघडतो आणि तिथेच लघवी करू लागतो. लघवी केल्यानंतर तो लिफ्ट थांबवतो आणि तिच लघवी पायाने साफ करत तो लिफ्टबाहेर पडतो आणि तिथून निघून जातो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @sheetrandum या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “आपण लोकांना शिक्षित करण्यात अपयशी ठरलो का, की आपण माणसांच्या रुपात प्राण्यांचे संगोपन करत आहोत. हे कालच घडले, अशा लोकांपासून सुरक्षित राहा.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला ३ लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलं नाही.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याच्याविरोधात तक्रार करा” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “त्याला कसला तरी आजार असेल असं मला वाटतं” तर तिसऱ्याने “अशा माणसांवर लगेच कारवाई करायला हवी” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “याने तर हद्दच पार केली”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of delivery boy peed in lift while delivering the parcel video viral on social media dvr