Shocking Video: लहान मुलं खेळण्याच्या, मस्तीच्या नादात अनेकदा स्वत:लाच दुखापत करून घेतात. कधीकधी त्यांच्याकडून नकळत झालेली चूक त्यांच्या जीवावरही बेतू शकते. अनेकदा गाड्या असतानाही रस्त्यावर खेळणं किंवा नदी, समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करणं अशा सगळ्या गोष्टी आयुष्य संपवू शकतात. नकळत झालेली एक चूक लहान मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते आणि अशात नेहमीच नशीब साथ देत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मुलांच्या अशा करामतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलाच्या एका चुकीमुळे तो जीवघेण्या संकटात सापडतो, नेमकं काय घडतं, जाणून घेऊ या…

लहान मुलाचा प्रताप पडला भारी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक लहान मुलगा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरवर पडला आहे. व्हिडीओच्या कॅप्शननुसार लहान मुलगा आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढला होता. तेवढ्यात अचानक तो पाय घसरून खाली इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरवरच पडला. काही ऑटोरिक्षाचालकांनी मदत केली आणि त्याला वाचवलं असंही या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @virarmerijaan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “चालू असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरवर लहान मुलगा पडला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आशा आहे की तो सुरक्षित असावा,” तर दुसऱ्याने “त्याला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ बनवत आहेत” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “पण तो तिकडे गेलाच कसा?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of little boy fell on electric transformer viral video on social media dvr