आजकालची लहान मुलं जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झाली आहेत, असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून हल्ली लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तरी ती असं काही करून बसतात की, जे निस्तरणंदेखील कठीण होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते आणि ती म्हणजे त्यांचा योग्य रीतीनं सांभाळ करण्याची. मुलांच्या लहानसहान गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, आजकाल काही जण रीलच्या एवढे आहारी गेले आहेत की, त्यांना कसलंच भान नसतं. आपल्या मुलांकडेही असे पालक दुर्लक्ष करतात आणि त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागते.

सध्या पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे एक असाच अनर्थ होता होता टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

चिमुकलीचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक चिमुकली मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसतेय. तिच्या आजूबाजूला तिचे पालकदेखील दिसत नाहीयेत; पण पाठीमागून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करीत रील बनवली जात असल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये चिमुकली खाली उतरत असताना अचानक तिचा तोल जातो आणि एक-दोन पायऱ्यांवरून ती खाली घरंगळत जाते, असं दिसतंय. पण, सुदैवानं तिथून एक आजोबा वर चढून येत असतात. चिमुकली खाली पडताना पाहून आजोबा धावत तिच्याजवळ जातात आणि तिला उचलतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @marathi_songs143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला ‘किती निष्काळजीपणा आहे.. बरं झालं समोर बाबा होते’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, त्याला तब्बल ६.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “लोक रील बनवण्यासाठी पागल झाले आहेत”. दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “ती वर यायची वाट नाही, तरी ते बाबा तिथून वर येत होते. ते नसते तर काय झालं असतं मुलीच, ती अजूनच खाली गेली असती.” तिसऱ्यानं, “रीलसाठी आजकालचे आईबाबा जीव घेतील मुलांचा”, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of little girl fell down from temple stairs while her parents makes reel video viral dvr