सोशल मीडियावर अनेकदा शाळकरी विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये अनेकदा विद्यार्थी डान्स करत असतात, तर काही विद्यार्थी आपली कला सादर करत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ पाहून आपसूकच हसू उमटतं. पण, सध्या एका ठिकाणी अशी घटना घडलीय, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सरकारी शाळेतील एक भयंकर आणि विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शाळेतील दोन मुली अचानक वर्गातील दरवाजामधून बाहेर उडी मारतात आणि विचित्र प्रकार करू लागतात. नेमकं त्यांच्याबरोबर काय घडतं, ते जाणून घ्या…

सरकारी शाळेतील विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका सरकारी शाळेत एक विचित्र प्रकार घडताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक सरकारी शाळा दाखवलीय. या शाळेच्या दरवाजातून अचानक दोन मुली शाळेबाहेर असलेल्या मैदानात उड्या मारतात आणि त्या मैदानावर लोळू लागतात, उड्या मारून पडू लागतात आणि विचित्र प्रकार करू लागतात. यामुळे तिथे आधी खेळत असणारी शाळकरी मुलं घाबरतात आणि त्यांच्यापासून लांब पळतात आणि शाळेच्या दरवाजातून अनेक मुलं वाकून हा सगळा प्रकार घडत असताना बघत असतात. पण, हे सगळं सुरू असताना कोणीच त्या मुलींची मदत करण्यासाठी पुढे येत नाही.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/C_ZXY7kh2UG/?igsh=eXl4eWJ3Y2ZicHVz

शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ @nexus_study या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ११.३ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील ‘हा’ व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या दोघी परीक्षेत अभ्यास करून आल्या नव्हत्या म्हणून अशा करतायत.” तर दुसऱ्याने “खोटा अभिनय करतायत, अजून काही नाही” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “सगळे उभे राहून फक्त बघतायत, त्यांची मदत करायला कोणीच पुढे जात नाहीये.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of two female students did weird act in government school viral video on social media dvr