Woman stunt video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात रील्स, डान्स, अभिनयाचं प्रमाण जास्त आहे. या असंख्य व्हिडीओंमध्ये असे काही व्हिडीओ असतात की, जे कायम लक्षात राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हल्ली लोक जीवावर बेतेल असे स्टंट करताना दिसतात. त्यात काही जण आपला जीव गमावतात; तर काही जण गंभीर होतात. आजूबाजूला अशा घटना घडत असूनही काही लोकांची अशी कृत्यं अजूनही सुरूच आहेत. अशाच घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला घराच्या छतावर चढून डान्स करताना दिसतेय. पण, हा डान्स तिच्यात अंगलट आल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतंय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ…

स्टंट आला अंगलट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला घराच्या छतावर चढून स्टंट करताना दिसतोय. छतावर चढून ही महिला डान्स करताना दिसतेय. खाली उतरत असताना तिची साडी पत्र्याला अडकते आणि ती तशीच खाली कोसळते. जोरात खाली आदळल्यामुळे तिला दुखापत झाली असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतंय.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gokulpagare488 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘डान्स करता करता पडली रे…’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “यापुढे ही महिला कधीच व्हिडीओ काढणार नाही”. तर दुसऱ्याने “काय गरज आहे का हे करायची” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “एका रीलसाठी तुम्ही आयुष्य का धोक्यात टाकता?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of woman stunt dancing on roof then fall down video viral on social media dvr