Snake Video Viral: घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला तर त्याचं आश्चर्य आपल्याला वाटत नाही. पण आपल्या राहत्या घरात, गल्लीबोळात, आजूबाजूच्या परिसरात, एवढंच नव्हे तर आपल्या अंगावर जर अचानक साप आला तर नक्कीच सगळ्यांचा थरकाप उडेल. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका माणसाच्या घरात एक नाही तर किमान १०० साप सापडले, नेमकं घडलं काय, जाणून घेऊ या…
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका रहिवाशाला त्याच्या घरात किमान १०० साप लपलेले आढळले. जलालाबादमधील मुडिया कला गावातील रहिवासी श्रवण कुमार आपले घर स्वच्छ करत असताना त्यांना एका कोपऱ्यात एक ड्रम पडलेला दिसला. तो पडलेला ड्रम उचलण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांना एक साप बाहेर येताना दिसला तेव्हा ते घाबरून ओरडले. पण ही थरारक घटना एकाच सापावर थांबली नाही. ड्रम पूर्णपणे काढून टाकल्यानंतर, कुमार घाबरले कारण तिथे एक नाहीतर तर जवळजवळ १०० साप एकमेकांना गुंडाळले गेले होते.
घाबरलेल्या श्रवण कुमार यांनी ताबडतोब गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. काही मिनिटांतच लोक त्यांच्या घरी जमले, ज्यात एका सर्प मित्राचाही समावेश होता ज्याने त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना वाचवले आणि नंतर त्यांना जवळच्या जंगलात सोडून दिले.
घरात सापडले १०० साप (100 Snakes found in a house Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @sanjayjourno या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “शाहजहांपूर: एका घरात १०० हून अधिक साप आढळले” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.
स्थानिक अहवालांनुसार, हे साप विषारी असल्याचे मानले जात होते. गावकऱ्यांनी असा दावा केला की ही प्रजाती अपरिचित वाटत होती, अगदी ते जुन्या किंवा दुर्मिळ जातीचे असू शकतात असे सुचवले – तरी अद्याप यावर अधिकृत पुष्टीकरण देण्यात आलेले नाही.
ग्रामीण भारतात असे साप दिसणे असामान्य नसले तरी, एकाच घरात आढळणाऱ्या या सापांची संख्या खूपच धक्कादायक आहे.