ताजमहाल ही एक आश्चर्यकारकपणे सुंदर ऐतिहासिक वास्तू आहे. ताजमहाला हा जगातील सात आश्चार्यांपैकी एक आहे जो पाहण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने लोक येतात. ताजमहाल हे भारतातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे, जे जगभरातील लोकांना आवडते. त्याच्या सौंदर्याने शतकानुशतके हृदय जिंकले आहे, ज्यामुळे ते सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक बनले आहे. ताजमहाल हे प्रेमाचे आणि परिपूर्ण वास्तुकलेचे प्रतीक आहे, जे भारताच्या समृद्ध वारशाचे प्रदर्शन करते. त्याचे सौंदर्य कालातीत आहे आणि जगभरातील लोकांना मंत्रमुग्ध करत आहे. पण याच ऐतिहासिक वारशाची दुरावस्था झाल्याचे एका धक्कादायक व्हिडीओतून समोर आले आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये विदेशी महिलेने ताजमहालच्या मागील कचऱ्याचा ढिगाचा व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

सोशल मीडियावर ताजमहाला मागील अवस्था दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्यटकांनी दावा केल्याप्रमाणे आग्रा येथे रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये ताजमहालजवळ कचरा आणि सांडपाण्याचे ढीग दिसत होते. या क्लिपमध्ये ते दुर्गंधी पाहून अस्वस्थ झालेले दिसत होते, तर एकाने उपहासात्मकपणे त्या दृश्याचे वर्णन करत ” हा खरा भारत आहे” अशी टिका केली.

@podroznikdowynajecia या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ताजमहालाच्या अगदी मागे यमुना नदीकाठी कचऱ्याचे ढीग आणि साचलेले सांडपाणी दिसत होते. ज्यामुळी परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.
ताजमहालजवळील कचरा आणि सांडपाण्या पाहून पॉलिश पर्यटकांची मोठी निराशा झाली. एका महिलेने स्वत:चे नाक झाकले आहे. हे दृश्य पाहून तिला उलटी येत आहे असे दिसते.दुसऱ्याने कमेंट केली केली, “ताजमहाल कुठे आहे? तो भयंकर दुर्गंधीयुक्त आहे. चेन्नईपेक्षाही वाईट,”

पर्यटकांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केले की,”त्यांचा संपूर्ण भारतावर टीका करण्याचा कोणताही हेतू नव्हता. “भारत हा एक महान देश आहे. जगाच्या या महान भागाचा द्वेष करण्याचा विचार आपण कधीही करणार नाही. येथे अनेक स्वच्छ आणि सुंदर ठिकाणे आहेत. आम्ही लवकरच परत येण्याची आणि भारताच्या या चांगल्या बाजूचे व्हिडिओ शेअर करण्याची योजना आखत आहोत,” असे त्यांनी लिहिले.

या व्हिडिओवर ऑनलाइन वाद पेटला. अनेक वापरकर्त्यांनी पर्यटकांचे म्हणणे बरोबर असल्याचे म्हटले तर काहींनी त्यांना जे दिसले ते एका वेगळ्या समस्येचे चित्रीकरण करून मते गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

एका वापरकर्त्याने म्हटले, “मला समजले, काही ठिकाणे घाणेरडी आहेत. पण भेट देण्यासाठी इतकी सुंदर ठिकाणे असताना घाणेरडी जागा का शोधायची?”

दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “लाजिरवाणे. पोलंडच्या जंगलातही तुम्ही असे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. त्याची खिल्ली उडवण्याऐवजी असे का घडते याबद्दल का बोलू नये?”

पण, काही वापरकर्ते पर्यटकांशी सहमत होते. “ताजमहाल अद्भुत आहे पण आजूबाजूचा परिसर… एक भारतीय म्हणून मला त्याची परिस्थिती माहित आहे,” असे एका वापरकर्त्याने म्हटले.

व्हायरल व्हिडीओने भारतातील काही सर्वात प्रतिष्ठित स्थळांभोवती सुरू असलेल्या कचरा व्यवस्थापन आव्हानांवर पुन्हा प्रकाश टाकला.