DSP Anju Yadav Inspiring Journey : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात धाडसाने पुढे येत आहेत, धीटपणे व्यक्त होत आहेत. पण, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत किंवा आणखीन कोणत्याही क्षेत्रात उतरण्यासाठी आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना वैयक्तिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) अंजू यादव यांची इन्स्टाग्राम पोस्टसुद्धा अशीच एक गोष्ट सांगत आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी घरकामापासून ते पोलिस दलात सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापर्यंतचा त्यांचा उल्लेखनीय प्रवास सांगितला आहे. पारंपरिक पोशाख आणि दुसरीकडे पोलिसांच्या गणवेशातील फोटोंचा कोलाज शेअर करीत अंजू यादवने त्यांना ज्या वैयक्तिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड द्यावे लागले त्याबद्दल सांगितले आहे.

अंजू यादव यांनी त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील फरक स्पष्ट करीत म्हटले, “जेव्हा पहिला फोटो काढला गेला तेव्हा काहीतरी बनण्याची, कोणतीही आशा मनात नव्हती आणि मी कधीही डीएसपी हा शब्द ऐकलाही नव्हता. मी फक्त एक महिला होते, जी सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम करायचे आणि दुसऱ्या दिवसाची वाट बघत बसायचे. थकवा, मर्यादा आणि भीतीमुळे कधी काळी स्वप्न पाहण्याचा विचारही मला नकोसा वाटत होता.” अशी परिस्थिती त्यांची एकेकाळी होती; पण मनात पोलिस दलात सेवा करण्याचे स्वप्नही होते.

एक दिवस सर्वकाही बदलते (Anju Yadav Inspiring Journey)

अंजू यादवचा प्रवास वेदना, अपमान व धमक्यांनी भरलेला होता; पण शेवटी याच प्रवासाने तिला स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व स्वाभिमानही मिळवून दिला. पण, हे स्वातंत्र्य तिला एका रात्रीत मिळाले नाही. त्यासाठी अनेक वर्षे लागली. तिचे स्वप्न फार मोठे नव्हते. तिला फक्त स्वतःला आणि मुलाला सन्मानाने वाढवायचे वा मोठे करायचे होते. पण, स्वप्न साध्य करायलाही तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप मोठा त्याग करावा लागला. पण अखेरीस त्यांना प्रेम, आदरासह प्रतिष्ठाही मला मिळाली आणि अशा प्रकारे त्या पहिल्या चित्रातील महिलेपासून दुसऱ्या चित्रातील महिलेकडे वळल्या.

त्यामुळे अंजू यादव हिने गावातील आणि वंचित घरांमधील महिलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या संघर्षांवरही प्रकाश टाकला आणि सगळ्यांनी महिलांनी हिंमत दाखवून त्यांना टोमणे, गैरवापर, हिंसाचार किंवा त्यांच्या पालकांच्या घरी परत पाठवण्याच्या धमकीला तोंड देण्यासाठी तयार राहिले पाहिजे. स्वप्ने सत्यात उतरतात. जर तुम्ही मनापासून त्यावर काम केलं आणि त्यात जीव ओतला तर एक दिवस सर्व काही बदलते. महिलांसाठी या गोष्टी थोड्या कठीण जातात, मार्ग कठीण असतो, वेळ जास्त लागतो; पण, त्यांनाही हे सर्व काही मिळू शकते अंजू यादवने दाखवून दिले.

सोशल मीडियावर ही पोस्ट @anjuyadav_dsp या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमधील तिचा प्रवास पाहून द बेटर इंडियाने तिला ‘लाखो महिलांसाठी आशा आणि प्रेरणेचा किरण’ म्हटले आहे; तर काहींनी तिच्या दृढनिश्चयाचे कौतुक केले आहे. एका युजरने, “संघर्षातून मिळालेली ताकद हाच खरा विजय असतो; तुमचा प्रवास वाचून आनंद झाला”. “तुमचा प्रवास येणाऱ्या पिढीला हिंमत देईल”, “तुम्ही माझी प्रेरणा आहात… माझी कहाणी तुमच्यासारखीच आहे आणि मी पीएससीची तयारीदेखील करत आहे.. पण मी दिवसभर कामावर जाते आणि रात्री अभ्यासासाठी वेळ काढते आणि नंतर पहाटे ४ वाजता उठते” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.